News Flash

तारक मेहता आणि जेठालाल मध्ये भांडण, सेटवर एकमेकांशी बोलणं बंद

जाणून घ्या नक्की काय आहे कारण

गेल्या १२ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता यांच्या मैत्रीचे उदाहरण नेहमीच दिले जाते. जेठालालची भूमिका दिलीप जोशी आणि तारक मेहताची भूमिका शैलेश लोढा साकारत आहेत. जेठालाल कोणत्या कठीण परिस्थितीत अडकला असेल तर तारक मेहता त्याच्या मदतीसाठी लगेच धावून येतो. मात्र, ही मैत्री फक्त शूटिंग करतानाच दिसते, त्या दोघांना एकमेकांशी बोलायला सुद्धा आवडत नाही. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘आजतक’ ने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप जोशी आणि शैलेश लोढा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांशी बोलत नाही आहेत. ते दोघे फक्त शूटिंग दरम्यान एकत्र दिसतात त्यानंतर ते एका ठिकाणी एकत्र थांबत सुद्धा नाहीत आणि आपल्या-आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातात. सगळ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच भांडण हे खूप जुन आहे. मात्र, याचं कारण कोणाला ठावूक नाही.

अनेक प्रेक्षकांना तर ही गोष्ट खोटी असल्याचे वाटते. कारण के दोघेही ज्या पद्धतीने अभिनय करतात. त्यावर त्यांच्यात वाद सुरू आहेत हे वाटतं नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. एवढ्या वर्षांपासून आपले मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील कलाकारांमध्ये भांडव होणे, ही त्यांच्या चाहत्यांसाठी थक्का दायक बातमी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:41 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah dilip joshi shailesh lodha fight details dcp 98
Next Stories
1 “प्रदूषणामुळे लिंगाचा आकार होतोय लहान”; दिया मिर्झा म्हणाली …
2 १३ वर्षांच्या दुराव्यानंतर श्वेता तिवारीच्या मुलीची वडिलांशी भेट
3 हार्दिक पांड्यासोबत नताशाचा रोमांस, शेअर केला पूलमध्ये किस करतानाचा फोटो
Just Now!
X