News Flash

‘दयाबेन’ हॉलिवूड चित्रपटामध्ये? पाहा मजेशीर व्हिडीओ

सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून मालिकेतील सर्व पात्रे ही कामयच चर्चेत असतात. पण मालिकेतील सर्वांची आवडती दयाबेन म्हणजेच दिशा वकानी गेल्या काही दिवसांपासून मालिकेपासून लांब आहे. आता तिचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना दयाबेनने हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे? असा प्रश्न पडला आहे.

दिशा वकानीच्या एका फॅन पेजने दयाबेनचा एक मेजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दया एकदम हटके आणि मॉर्डन अंदाजात दिसत आहे. दयाला अशा अंदाज चाहत्यांनी पहिल्यांदाच पाहिले आहे. पण हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Vakani (@dishavakanioffcal)

Video: सेल्फी काढायला आला अन् अभिनेत्रीला केलं किस

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ खरतर एका फेस अॅपच्या मदतीने एडिट करण्यात आला आहे. त्यामुळे दिशा वकानी हॉलिवूड चित्रपटातील फिक्शन कॅरेक्टर Harley Quinnच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

दिशा वकानी २०१७पासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब आहे. गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. ४ वर्षे उलटली तरी देखील चाहते तिची प्रतिक्षा करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मालिकेचे निर्माते आसिद मोदी यांनी दयाबेनच्या वापसीवर वक्तव्य केले होते. ‘ती प्रेग्नंट होती, त्यानंतर तिला बाळ झाले, आम्ही देखील विचार केला की तिला बाळासोबत थोडा वेळ घालवू द्यावा आणि तिच्या नसण्याने इतका फरक पडला नाही. सर्वजण मालिका एन्जॉय करत होते. आता मालिकेला दयाबेनची गरज आहे. एक किंवा दोन महिन्यात दयाबेन परत येईल’ असे ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 7:13 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah disha vakani aka dayaben turns into harley quinn funny avb 95
Next Stories
1 करोनामुळे दिलीप कुमारांच्या भाच्याला मिळेना काम
2 टिकटॉक स्टारला बलात्कार प्रकरणात अटक, अल्पवयीन पीडित मुलगी आहे चार महिन्यांची गर्भवती
3 ‘राधे’मध्ये सलमान आणि दिशाची केमिस्ट्री पाहून टायगर म्हणाला…
Just Now!
X