01 March 2021

News Flash

“दया बेन आली तर ठिक, नाहीतर…”; दिशा वकानीच्या कमबॅकवर निर्मात्यांचं मोठं विधान

'तारक मेहता'मध्ये दया बेन कमबॅक करणार का?; निर्माता म्हणाले...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून नावारुपास आलेली अभिनेत्री दिशा वकानी उर्फ दया बेन मालिकेत पुन्हा कधी परतणार? हा प्रश्न चाहते सातत्याने विचारत आहेत. लग्नाच्या निमित्ताने मालिकेतून ब्रेक घेणारी दिशा अडिच वर्षानंतरही परतलेली नाही. नुकतेच ‘तारक मेहता’ मालिकेला १२ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत निर्माता असित मोदी यांनी दयाबेन या व्यक्तिरेखेबाबत मोठं विधान केलं. दिशा वकानी पुन्हा अली तर ठिक नाहितर आमचं तिच्यावाचून काही अडत नाही, असं ते म्हणाले.

दया बेन ही ‘तारक मेहता’ मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा आहे. मालिकेतील अनेक प्रसंग या व्यक्तिरेखेभोवती फिरताना आपण पाहिले आहेत. शिवाय आपल्या अनोख्या अभिनय शैलीतून दिशाने या भूमिकेला प्रचंड लोकप्रिय केलं. मात्र दया बेनला पुन्हा कधी पाहायला मिळणार? याबाबत असित मोदी यांनी मोठं विधान केलं. ते म्हणाले,

अवश्य पाहा – टायगरच्या बहिणीनं मादक अदांनी अनेकांना केलं घायाळ; सेलिब्रिटीही झाले फिदा

“आम्ही दिशाला मालिकेत परत येण्यासाठी अनेकदा विनंती केली. परंतु तिने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. दिशा वकानी पुन्हा अली तर ठिक नाहितर आमचं तिच्यावाचून काही अडत नाही. गेल्या अडिच वर्षांपासून दया बेन नसतानाही मालिका सुरु आहे. पण मालिकेच्या टीआरपीवर काहीही परिणाम झालेला नाही. आजही प्रेक्षक आमच्यावर तितकच भरभरुन प्रेम करत आहेत. कुठलीही मालिका एका व्यक्तीमुळे नव्हे तर संपूर्ण टीममुळे चालते. आमची टीम खूप चांगलं काम करत आहे. गेल्या अडिच वर्षात दिशा वकानीची कमतरता आम्हाला बिलकूल भासलेली नाही.”

अवश्य पाहा – सुशांत आत्महत्या प्रकरण: करणवर आरोप करताना कंगनाने आदित्य ठाकरेंचाही केला उल्लेख

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी मालिकांपैकी एक आहे. २८ जुलै २००८ रोजी या मालिकेचा पहिला भाग टीव्हीवर प्रसारीत झाला झाला होता. तेव्हापासून तब्बल १२ वर्ष ही मालिका सातत्याने लोकांना हसवत आहे. या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचं फॅन फॉलोईंग आज कुठल्याही बॉलिवूड कलाकारापेक्षा कमी नाही. यावरुनच ‘तारक मेहता’ मालिकेच्या लोकप्रियता अंदाज आपल्याला येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 12:44 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah disha vakani asit kumarr modi mppg 94
Next Stories
1 बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जॅकलीन फर्नांडिस व्यक्त; म्हणाली, ‘मला कामाची गरज आहे म्हणून…’
2 ‘जुळून येती रेशीमगाठी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला
3 “भट्ट कुटुंबीयांनी माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; अभिनेत्याचा खळबळजनक आरोप
Just Now!
X