‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी लवकरच परतणार आहे. दिशाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन आपल्या आगमनाबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. या व्हिडीओमार्फत “मी लवकरच परत येत आहे.” असा संदेश तिने तारक मेहता मालिकेच्या चाहत्यांना दिला आहे.

 

View this post on Instagram

 

Coming Back Soon

A post shared by DISHA VAKANI (@dishavakanioffcal) on

दिशाने मालिकेत पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला असला, तरी तिच्या पतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिशा सध्या तरी काही भागांसाठीच मालिकेत परतणार अशी माहिती दिली. त्यामुळे दयाबेन पूर्वीप्रमाणेच मालिकेत पूर्णवेळ दिसेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

दिशा तब्बल दीड वर्षांनंतर या मालिकेत पुन्हा येणार आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये तिने प्रसूती रजा घेतली. त्यानंतर ती मालिकेत परतणार होती. मात्र बाळंतपणानंतर मालिकेत येण्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. यात तिने मानधनात वाढ करण्याचंही सांगितलं होतं. निर्मात्यांनी तिला ३० दिवसांचा अल्टिमेटमसुद्धा दिला होता. पण दिशाकडून काहीच उत्तर न आल्याने त्यांनी दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीला निवडल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र अखेर पुन्हा एकदा दिशाच दयाबेनच्या रुपात पाहायला मिळणार आहे.