23 September 2020

News Flash

‘काही लोकांना समजतच नाही की ते..’, मुलाखतीमध्ये संतापली बबिता

तिने एका मुलाखतीमध्ये संताप व्यक्त केला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा चर्चेत असतो. पण बबिता आणि जेठालाल हे पात्र विशेष चर्चेत असतात. त्या दोघांमधील संवाद देखील चाहत्यांना प्रचंड आवडतात. बबिताची भूमिका साकारणाऱ्या मुनमुन दत्ताने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांविषयी संताप व्यक्त केला आहे.

‘जे लोकं प्राण्यांवर अत्याचार करतात आणि त्यांना दूर हकलतात त्यांचा मला प्रचंड राग येतो. कोणीही मुक्या प्राण्यांना त्रास देत असेल तर ते पाहून मला वाईट वाटते. काही लोकांना समजतच नाही की ते उगाच मुक्या प्राण्यांवर अत्याचार करतात. जर आपल्यासोबत असे कोणी वर्तन केले तर आपल्याला कसे वाटेल याचा विचार करावा’ असे मुनमुन म्हणाली.

पाहा : जेठालालवर भुरळ घालणाऱ्या बबिताचा चर्चेत असलेला ग्लॅमरस लूक पाहिलात का?

त्यानंतर तिने एक इच्छा देखील व्यक्त केली आहे. ज्या प्राण्यांना मदतीची गरज आहे अशा प्राण्यांना सांभाळण्यासाठी तिचा एक फार्म हाऊस असावा अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 5:31 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame actress munmun dutta aka babita talks about animal cruelty avb 95
Next Stories
1 “आयुष्यभरासाठी लॉकडाउनमध्ये गेलास”; अक्षयने राणाला दिल्या लग्नाच्या शुभेच्छा
2 Video : परदेशी आणि भारतीय सिनेमांमधील फरक सांगतोय अक्षय इंडीकर
3 “तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे, तुम्ही फक्त…”; सोनू सूदची देशवासियांकडे मागणी
Just Now!
X