News Flash

“तो क्षण मी कधीच विसरणार नाही..”, तारक मेहता मधील दया बेनने सांगितली पहिल्या पगाराची कहानी

दिशाने एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.

गेल्या १२ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, चंपकलाल चाचा, टप्पू आणि दया बेन यांची लोकप्रियता तर आपल्या सगळ्यांना माहित आहे. २०१७ मध्ये दयाबेन म्हणजेच दिशा वकानीने मालिका सोडली. त्यानंतर निर्मात्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, दया बेन परत आली नाही. दिशा वकानीची एक मुलाखत आता व्हायरल होत आहे. यात दिशाने तिच्या पहिल्या पगारा विषयी सांगितले आहे.

“माझ्या पहिल्या नाटकासाठी मला २५० रुपये मिळाले होते. मला आठवते की मी ती रक्कम माझ्या वडिलांकडे दिली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते; तो क्षण मी कधीच विसरणार नाही, तो नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील. एक कलाकार म्हणून, आर्थिक समाधानापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे असते”, असे दिशा एका मुलाखतीत म्हणाल्याचे वृत्त ‘कोईमोई’ वृत्तवाहिनीने दिले आहे.

एवढ्या वर्षांपासून आपले मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील कोणतीही भूमिका बदलली तरी त्याचा परिणाम हा प्रेक्षकांवर होतो. आता काही दिवसांपूर्वी दिशा वकानी शोमध्ये पुन्हा येणार नाही ही बातमी ऐकून प्रेक्षकांना धक्का बसला आहे. मात्र, तरीही अनेक प्रेक्षक दया बेन पुन्हा कधीतरी मालिकेत येईल ही आशा धरून बसले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 8:20 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame disha vakani earned rs 250 as her first salary dcp 98
Next Stories
1 “म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला..”, अभिषेकने सांगितले ऐश्वर्याशी लग्न करण्याचे कारण
2 अक्षय पाठोपाठ गोविंदा करोना पॉझिटिव्ह
3 बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Just Now!
X