31 October 2020

News Flash

तारक मेहता फेम दिशा वकानी ‘बिग बॉस’मध्ये झळकणार का? निर्मात्यांनी दिलं आमंत्रण

'बिग बॉस १४' मध्ये दया बेन झळकणार का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोच्या १४ व्या सीझनची सुरुवात येत्या ऑक्टोंबर महिन्यात होईल. दरम्यान या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार झळकणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेत्री दिशा वकानी हिची. परंतु खरंच दिशा बिग बॉसमध्ये झळकणार का?

या १० अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर साकारली नागिन; तुमची फेव्हरेट कोण?

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे नावारुपास आलेली ‘दया बेन’ उर्फ दिशा वकानी बिग बॉसच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार असं म्हटलं जात आहे. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार बिग बॉसकडून दिशाला शोमध्ये भाग घेण्याचं आमंत्रण मिळालं आहे. परंतु दिशाने याबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बिग बॉसमध्ये झळकणाऱ्या स्पर्धकांची यादी अद्याप जाहिर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर दिशा बिग बॉसमध्ये झळकणार का? याबाबत चाहते उत्सुक आहेत.

रस्त्यावरील चहावाला ते सुपरमॉडेल; एका फोटोमुळे रातोरात सुपरस्टार झालेले ‘सात’ कलाकार

‘बिग बॉस’चं १४ वं पर्व लांबणीवर

गेल्या काही दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे ‘बिग बॉस’च्या सेटवर पाणी साचलं. त्यामुळे सेट खराब झाला. शिवाय पाऊस सुरु असल्यामुळे सेट काढताही येत नाही. त्यामुळे आता पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा नवा सेट तयार केला जाईल. त्यानंतर ‘बिग बॉस’चं शूट सुरु होईल. या प्रक्रियेला किमान आणखी एक महिना लागेल असं क्रिएटिव्ह टीमने सांगितलं आहे. परिणामी ‘बिग बॉस’ चाहत्यांना १४ वं पर्व पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 3:35 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame disha vakani gets offer from bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 अश्लील कॉमेंट करणाऱ्या ट्रोलर्सवर अभिनेत्री संतापली; करणार कायदेशीर कारवाई
2 ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
3 फार्महाऊसवर स्टारने सुशांतचे करिअर संपवायची दिली होती धमकी, दिग्दर्शकाचा खुलासा
Just Now!
X