News Flash

‘तारक मेहता…’मधील अभिनेत्रीला पतीने दिली BMW बाइक गिफ्ट

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ सध्या मालिकेतील मिसेस रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफ मिस्त्री बंसीवाला चर्चेत आहे. या चर्चा जेनिफरचे पती बॉबी बंसीवाला यांनी लग्नाला २० वर्षे पूर्ण होताच जेनिफरला एक बाइक भेट म्हणून दिली असल्यामुळे सुरु झाल्या आहेत. जेनिफरचे लहान पणापासूनचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे.

जेनिफरच्या पतीने लग्नाच्या वाढदिवशी तिला बाइक गिफ्ट म्हणून दिली आहे. जेनिफरने सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती बीएमडब्ल्यू जावा या बाइकवर बसलेली दिसत आहे. बाइक चालवताना जेनिफर अतिशय आनंदी झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तिने ‘तुम्हाला काय वाटते, मी कोणती बाईक खरेदी केली आहे?’ असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा : कुंभमेळ्यातील अफाट गर्दी पाहून संतापली अभिनेत्री, म्हणाली…

जेनिफरची ही पहिली बाइक आहे आणि तिचे पती बॉबी बंसीवालाने लग्नाला २० वर्षे पूर्ण झाल्यामुळे ती भेट म्हणून दिली आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अभिनेत्रीने मोठी पोस्ट शेअर करत वडिलांना रॉयल एनफिल्ड चालवताना पाहून बाइक चालवण्याची इच्छा व्हायची असे म्हटले आहे.

पोस्टमध्ये पुढे तिने म्हटले आहे की सुरुवातीला पतीने बाइक खरेदी करण्यास नकार दिला होता. पण नंतर त्यांनी परवानगी दिली. माझे लहानपणापासूनचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 11:03 am

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame jennifer mistry bansiwal fulfills childhood dream bmw bike avb 95
Next Stories
1 बिकनी फोटोवरून ट्रोल करणाऱ्याची कृष्णा श्रॉफने केली बोलती बंद, म्हणाली…
2 “शक्तिमान घायल!”, मुकेश खन्ना यांनी सांगितला ‘तो’ भयानक अनुभव
3 आठवड्याची मुलाखत : चित्रीकरण करणे गरजेचे आहे का?
Just Now!
X