News Flash

‘तारक मेहता…’मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा बिकिनी लूक, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर भिडे मास्तरांची मुलगी सोनू म्हणजेच निधी भानूशाली चर्चेत आहे.

ती जंगलात फिरताना दिसत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील जेठालाल, दयाभाभी, माधवी भाभी, भिडे मास्तर, पोपटलाल, टप्पू किंवा सोनू या कलाकारांची चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर भिडे मास्तरांची मुलगी सोनू म्हणजेच निधी भानूशाली चर्चेत आहे.

निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती जंगलात फिरताना दिसत आहे. दरम्यान तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिने बिकिनी परिधान केली असून ती पोहताना दिसते. सध्या तिचा हा बिकिनी लूकमधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nidhi Bhanushali (@_ninosaur)

आणखी वाचा : अभिनेत्री यामी गौतम अडकली लग्नबंधनात; जाणून घ्या तिच्या पती विषयी

हा व्हिडीओ शेअर करत निधीने ‘जंगलात फिरण्याचा एक वेगळाच आनंद आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी कमेंट्सचा त्यावर पाऊस पडला आहे. जंगलात फिरताना निधीसोबत तिचा पाळीव श्वानदेखील असल्याचे दिसत आहे.

निधी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने तारक मेहता का उलटा चष्मामध्ये सोनू ही भूमिका साकारली होती. जवळपास ६ वर्ष तिने या मालिकेत काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:45 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame nidhi bhanushali aka sonu sizzles in a bikini avb 95
Next Stories
1 ‘कधी मुलगी बघितली नाही का?’ एकटक बघणाऱ्या व्यक्तीवर राखी संतापली
2 ‘महाराजांचे हे सिंहासनाधिश्वर दर्शन’, सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
3 ‘डान्स इंडिया डान्स’मधील स्पर्धक बिकी दासचा अपघात
Just Now!
X