News Flash

‘तारक मेहता…’ मालिकेत बाघाने घातलेल्या ‘या’ हूडीची खरी किम्मत ऐकूण नेटकरी हैराण

मालिकेतील एका एपिसोडमध्ये बाघाने ही हूडी परिधान केली होती.

taarak mehta ka ooltah chashmah
मालिकेतील एका एपिसोडमध्ये बाघाने ही हूडी परिधान केली होती.

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील जेठालाल, टप्पू आणि बबीताजी ही पात्र लोकप्रिय आहेत. मात्र, मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा तन्मय वेकरियाची चाहते काही कमी नाहीत. बाघाचे चाहते त्याच्या प्रत्येक गोष्टींचे निरिक्षण करतात. आता बाघाने एका एपिसोडमध्ये ६१ हजार रुपयांची हूडी परिधान केल्याचं त्याच्या चाहत्यांच्या लक्षात आलं आहे.

अलिकडेच ‘तारक मेहता…’ मालिकेची कहानी ही बाघाभोवती फिरताना दिसली. यावेळी बाघाच्या चाहत्यांच लक्ष हे त्याच्या हूडीकडे गेलं. तन्मयने परिधान केलेली हूडी ही बालेंसियागाची आहे. याची खरी किंमत ही ८३० डॉलर म्हणजेच ६१ हजार रुपये आहे. या ब्रॅंडचे कपडे हे चित्रपटसृष्टीतील सगळ्यात जास्त श्रीमंत लोक खरेदी करु शकतात. यावरून बाघाही ‘तारक मेहता…’ मालिकेतील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपेकी एक आहे असे चाहते म्हणतं आहेत.

आणखी वाचा : रौप्य पदक विजेत्या मिराबाई चानू यांना जमिनीवर बसून जेवताना पाहून आर माधवन म्हणाला…

 

View this post on Instagram

 

A post shared by Tanmay vekaria (@tanmayvekaria)

आणखी वाचा : मनसैनिकांकडून मार खाणारे शिवसेनेचे पदाधिकारी? आदेश बांदेकरांनी दिलं स्पष्टीकरण

मालिकेतील बाघा हा नट्टू काका यांचा पुतन्या आहे. एवढंच नाही तर तो गढा इलेक्ट्रॉनिक्समध्ये कामाला आहे. ‘जैसी जिसकी सोच’ ते त्याचे विनोद हे चाहत्यांच्या लक्षात राहून जातात. मात्र, या आधी बाघावर अशी वेळ होती जेव्हा त्याला ४ हजार रुपयांवर त्याच्या घरच्यांना सांभाळाव लागतं होतं. तन्मयने फक्त ‘तारक मेहता…’मध्ये नाही तर गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर तन्मयचे शिक्षण हे मुंबईत झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 6:47 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah fame tanmay vekaria aka bagha wearing a rs 61000 hoodie dcp 98
टॅग : Entertainment
Next Stories
1 निशिगंधा वाड यांच्या ‘बॅक टू स्कूल’ चित्रपटाचे चित्रीकरण झाले पूर्ण
2 “लस देतेयस की ड्रग्स”; ‘त्या’ व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्यांना कीर्ती कुल्हारीने दिलं उत्तर
3 ‘बिग बॉस १५’मध्ये सहभागी होणार नेहा कक्कर?