19 September 2020

News Flash

‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या सेटवर युनिटमधील सदस्याचा मृत्यू

दोन दिवस या मालिकेचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले आहे.

सब वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका तारक मेहता का उलटा चष्माच्या सेटवर एक दुःखद घटना घडली. या मालिकेच्या युनिटमधील अरविंद मरचंदे यांचा सेटवरचं मृत्यू झाल्याने दोन दिवस या मालिकेचे चित्रीकरण बंद ठेवण्यात आले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने अरविंद यांचे ३० जूनला निधन झाले.
मुख्य प्रॉडक्शन कंट्रोलर असलेले अरविंद यांना चित्रीकरण सुरु असातानाच अचानक छातीत दुखू लागले. आपल्याला अपचनामुळे असा त्रास होत असल्याचे समजून अरविंद यांनी दुखण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, काही वेळातचं त्यांना अधिक तीव्रतेने छातीत कळा मारू लागल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर त्यांना लगेचच जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अरविंद यांच्या निधनानंतर तातडीने शूटिंग थांबवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 5:51 pm

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah member arvind marchande dies on set
Next Stories
1 सलमानच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर शाहरुख म्हणाला..
2 VIDEO: कास्टिंग काउच विथ प्रिया बापट
3 परिणितीसोबत सुशांतचा ‘ताकडम’
Just Now!
X