News Flash

‘तारक मेहता…’मधील या अभिनेत्रीचा काढता पाय

या शोमधील मुख्य अभिनेत्री दिशा वकानी सुद्धा बऱ्याच काळापासून शोमधून बाहेर आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ थोड्या वेगळ्या पठडीतील, निखळ मनोरंजनाचा आनंद देणारी मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’कडे पाहिले जाते. ही मालिका टीआरपी यादीमध्ये नेहमी टॉप ५मध्ये असते. या मालिकेमधून अनेक कलाकरांनी छोट्या पडद्यावर एण्ट्री केली तर काही कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला. काही दिवसांपूर्वी टप्पूची भूमिता साकारणाऱ्या भव्य गांधीने शो सोडला तर निधी भानुशालीने देखील शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच अभिनेत्री दिशा वकानी देखील गेल्या काही दिवसांपासून मालिकेपासून लांब आहे. आता त्यातच शोमधील आणखी एक कलाकार बाहेर पडणार असल्याचे समोर आले आहे.

स्पॉटबॉयईने दिलेल्या वृत्तानुसार तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत ‘बावरी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरिया मालिका सोडणार आहे. मालिकेतील भूमिकेसाठी मिळणाऱ्या मानधनात मोनिका खूश नव्हती. तिने निर्मात्यांकडे मानधन वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र अनेक वेळा निर्मात्यांना सांगूनही मानधनात वाढ न झाल्याने मोनिकाने अखेर मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

‘मालिका आणि त्यातील भूमिका निश्चितच माझ्या जवळची होती. मला भूमिकेसाठी चांगल्या मानधनाची अपेक्षा होती पण निर्मात्यांना ते देणे मान्य नव्हते. जर ते माझे मानधन वाढवणार असतील तर मी मालिकेत पुन्हा येईन. पण मला नाही वाटत ते हे मान्य करतील. आता माझा मालिकेतील प्रवास इथेच संपलाय’ असे मोनिका मालिकेतील प्रवासाबद्दल विचारल्यावर म्हणाली.

 

View this post on Instagram

 

If you focus on the hurt u ll continue to suffer. if you focus on the lessons you ll continue to grow.

A post shared by Monika sushma bhadoriya (@monika_bhadoriya) on

गेल्या सहा वर्षांपासून मोनिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत ‘बावरी’ची भूमिका साकारात होती. तिने या मालिकेतीतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. मोनिकाने २० ऑक्टोबर रोजी मालिकेतील शेवटच्या एपिसोडचे चित्रीकरण केले आहे. मालिकेतील मोनिकाची भूमिका खूपच मनोरंजक होती. तिचा ‘हाय-हाय गलती से मिस्टेक हो गई’ हा डायलॉग प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतर होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 11:26 am

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah monika bhadoriya aka bawri bids goodbye to the show avb 95
Next Stories
1 Video : रणबीरला दुखापत नक्की कशामुळे?, चाहते चिंतेत
2 फत्तेशिकस्त : बॉक्स ऑफिसवर मराठी वीरांची फत्ते
3 रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी दीपिकानं केला खुलासा
Just Now!
X