छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील जेठालाल, दयाबेन, बबीता, चंपकलाला, मिसेस हाती ही सगळीच पात्र कायम चर्चेत असतात. पण दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७पासून मालिकेपासून लांब आहे. तिची मुलगी लहान असल्यामुळे तिने ब्रेक घेतला आहे. चाहते तिची आतुरतेने वाट पाहात आहे. पण आता मालिकेत दयाबेनची भूमिका एक नवी अभिनेत्री साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी दिशा वकाशी कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात होते. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे निर्माते असीत मोदी यांनी दयाबेन या पात्रासाठी नव्या अभिनेत्रीच्या शोधात असल्याचे सांगितले होते. त्यामुळे दिशाने मालिकेला कायमचा रामराम ठोकल्याचे स्पष्ट झाले होते. आता मालिकेत एव नवी अभिनेत्री दयाबेनच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

ही अभिनेत्री म्हणजे राखी विजान असू शकते. राखीने एका मुलाखतीमध्ये दयाबेन हे पात्र साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण मालिकेच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Vijan (@rakhivijan)

राखीने या संदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ‘दयाबेन हे एक आयकॉनिक कॅरेक्टर आहे. कोणतीही अभिनेत्री दयाबेन साकारु शकत नाही. मला जर हे पात्र साकारण्याची संधी मिळाली तर नक्कीच चांगल्या प्रकारे साकारण्याचा प्रयत्न करेन. प्रेक्षकांना हसवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन’ असे राखी म्हणाली.