छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेत्री प्रिया अहूजाचा मुलगा सहा महिन्यांचा झाला आहे. या आनंदाच्या वेळी प्रियाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या मुलाचा फोटो शेअर केला असून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
प्रियाने तिचा मुलगा सहा महिन्याचा होताच त्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने छान असे कॅप्शन दिले आहे. ‘माझा मुलगा सहा महिन्यांचा झाला आहे. मी तुला वचन देते की तुला हवे तसे तु आयुष्य मी तुला जगू देईन. तु काय करायला हवं आणि काय नाही हे तुला कोणीही सांगणार नाही. तुला आवडत असलेले तु काम करशील. मग ते तुझा एखादा टी-शर्ट खरेदी करणं असू दे किंवा मग तुझे कॉलेज, तुझा लाईफ पार्टनर असू दे. तु लग्न कर किंवा लिव्ह इनमध्ये रहा. सगळं काही तुझ्या मनासारखे होईल’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
‘मी कधीही तुझ्यासमोर फिल्मी डायलॉग मारणार नाही, जसं की तुला जन्माला घातले. तुला या जगात आणण्याचा माझा निर्णय होता. पण हे आयुष्य कसे जगाचे हा तुझा निर्णय असणार आहे. तु माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी आनंदी झाले आहे’ असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.
प्रिया तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये रिटा रिपोर्टरची भूमिका साकारत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ती मालिकेत दिसलेली नाही. मालिकेतील प्रियाचे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पंसतीला उतर असल्याचे दिसत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 29, 2020 8:34 pm