छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेकडे पाहिले जाते. ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. तसेच मालिकेधील जेठालालच्या दुकानात काम करणारे नट्टू काका हे पात्र देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. नट्टू काकाने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेते घनश्याम नायक यांनी नट्टू काका ही भूमिका साकारली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत याच नट्टू काकांविषयी…
नुकताच नट्टू काकाने ‘भास्कर’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे. ‘एक काळ असा होता की मला ३ रुपयांसाठी २४ तास काम करावे लागत होते. १० ते १५ वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करुनही फारसे पैसे मिळायचे नाहीत. कधी कधी तर केलेल्या कामाचे पैसे देखील मिळायचे नाहीत. तेव्हा मी माझ्या शेजारी राहणाऱ्यांकडून उधारीवर पैसे घेऊन घरातील समान आणि मुलांच्या शाळेची फी भरायचो’ असे ते म्हणाले.
आणखी वाचा : Video : ‘तारक मेहता’ मधील ‘बापूजीं’चे भांडी घासण्यावरुन भांडण, पाहा मजेशीर व्हिडीओ
‘मी माझे संपूर्ण आयुष्य स्ट्रगल करण्यात घालवले. पण आता तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम केल्यानंतर माझे आयुष्य बदलले. मी पैसे कमावण्यास सुरुवात केली आणि पुन्हा कधी मागे वळून पाहिले नाही. आज मुंबईमध्ये माझी दोन घरे आहेत’ असे ते पुढे म्हणाले.
घनश्याम नायक यांनी हिंदी चित्रपटांसह गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेत त्यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्येही काम केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 11, 2020 5:13 pm