‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेते दिलीप जोशी यांनी चाहत्यांच्या अग्रहाखातर अखेर इन्स्टाग्रामवर डेब्यू केलं आहे. त्यांनी २५ जुलै रोजी आपलं इन्स्टाग्राम अकाउंट सुरु केलं. लक्षवेधी बाब म्हणजे काही तासांत एक लाखांपेक्षा अधिक चाहत्यांनी त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवर पदार्पण करताच अभिनेत्री अंबिका राजंकर आणि पलक सिधवानी यांनी दिलीप जोशींच स्वागत केलं. दरम्यान त्यांनी आपल्या पहिल्याच पोस्टमध्ये आई आणि भावासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

अवश्य पाहा – लष्करातील नोकरी सोडून या अभिनेत्रीनं केलं बॉलिवूडमध्ये करिअर

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी

 

View this post on Instagram

 

Starting off with one of my most favourite memories with Baa and Bhai!

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi) on

अवश्य पाहा – “सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा”; मोदींनी दिलं भाजपा खासदाराच्या पत्राला उत्तर

इन्स्टाग्राम अकाउंट सुरु करताच दिलीप जोशींचं लक्ष सर्व प्रथम वळलं ते फेक अकाउंट्सवर. सोशल मीडियावर सध्या अनेक सेलिब्रिटींची फेक अकाउंट्स कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर दिलीपजींनी एक व्हिडीओ पोस्ट करुन फेक अकाउंट्सवर भाष्य केलं.

 

View this post on Instagram

 

जनहित में जारी…

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi) on

ते म्हणाले, “अकाउंट सुरु करताच हजारो चाहत्यांनी मला फॉलो करण्यास सुरुवात केली. त्या सर्वांचा मी आभारी आहे. पण तेवढ्यात माझी नजर काही फेक अकाउंटवर देखील पडली. या मंडळींनी माझ्या अकाउंटचे काही स्क्रिन शॉट घेऊन काही नवी अकाउंट्स सुरु केली आहेत. कृपया असं करु नका. ही अकाउंट्स त्वरित बंद करा अशी हात जोडून मी विनंती करतो.” दिलीप जोशींनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हा पहिलाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.