News Flash

‘बाहुबली’मधील या अभिनेत्यासोबत तब्बू करणार स्क्रीन शेअर?

तब्बू या चित्रपटात प्राध्यापिका आणि नागरी हक्क कार्यकर्तीच्या भूमिकेत दिसणार आहे

तब्बू

आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकरांनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. काही कलाकर तर दक्षिणेकडे लोकप्रियदेखील ठरले आहेत. त्या कलाकारांमधील एक म्हणजे बॉलिवूडमधील हुशार आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री तब्बू. तब्बू लवकरच तेलुगू चित्रपटात झळकणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या वृत्तानुसार तब्बू एका तेलुगू चित्रपटामध्ये प्राध्यापिका आणि नागरी हक्क कार्यकर्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच तब्बूसह राणा दग्गुबती आणि साई पल्लवीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वृत्तानुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य चित्रपट ‘निडी नाडी ओके काथा’चे सुप्रसिद्ध दिग्दर्शक वेणू उडुगुल करणार आहेत. या तेलुगू चित्रपटाची कथा तब्बूला ऐकवण्यासाठी वेणू मुंबईला आले होते. परंतु तब्बूने अद्याप या चित्रपटास होकार दिला नसल्याचे समोर आले आहे.

‘दिग्दर्शक वेणु उडुगुला गेल्या महिन्यात चित्रपटाची कहाणी तब्बूला ऐकवण्यासाठी मुंबईत आले होते. या चित्रपटातील स्क्रिप्ट आणि त्यातील भूमिकेबद्दल ऐकताच तब्बूला कुतूहल वाटले. उत्साहाने तिने चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. परंतु तब्बूने अद्याप कोणताही करार केलेला नाही’ असे डेक्कन क्रॉनिकलने म्हटले आहे. या चित्रपटात राणा दग्गुबती एका पोलिसाची भूमिका साकारणार असून साई पल्लवी नक्षलवाद्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

सध्या तब्बू तिचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात तब्बू अभिनेता अजय देवगणच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच हा चित्रपट अकिव अली दिग्दर्शित करणार आहेत. हा चित्रपट १७ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय आणि तब्बूसोबत राकूल प्रित सिंगदेखील चित्रपटात झळकणार आहे. या जोडीला पुन्हा एकदा सोनेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 1:36 pm

Web Title: tabu to star in a telugu film as a civil rights activist alongside rana daggubati and sai pallavi
Next Stories
1 ‘ईन्शाल्ला’मध्ये ४० वर्षांचा सलमान आणि आलियाची ही असेल कथा
2 तनुश्रीच्या आरोपांवर अजय देवगणचं स्पष्टीकरण
3 अभिनेत्री किम शर्माविरोधात पोलिसांत तक्रार
Just Now!
X