बॉलिवूड कलाकारांपेक्षा त्यांची मुलं म्हणजेच स्टारकिड्स सतत चर्चेत असतात. त्यात करीनाचा लाडका लेक तैमूर नेहमीच कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेचा विषय ठरतो. काही दिवसांपूर्वी तैमूरने धर्मशाळा येथे मातीचे भांडे बनवले होते. त्याचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. धर्मशाळा येथे सुट्ट्यांचा आनंद घेताना तैमूरने चक्क स्वयंपाकाचे धडे घेतले आहेत. त्याचे स्वयंपाक बनवतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

धर्मशाळा येथील हयात रीजेंसी हॉटेल यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमूरचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये खान कुटूंबीय हे हॉटेलच्या स्टाफसोबत दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तैमूरने शेफ प्रमाणे काळ्या रंगाचे अॅपरन घातले असून तो चॉकलेट एगशेल बनवताना दिसत आहे. तर करीना आणि सैफ हे त्याच्याकडे पाहत असून तैमूरला सल्ला देताना दिसत आहेत. दरम्यान करीनाने काळ्या रंगाचे स्वेटशर्ट परिधान केले आहे. तर सैफने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

धर्मशाळा येथील हयात रीजेंसी हॉटेल यांनी तैमूरला स्वयंपाकाचे धडे देण्यासाठी एक सेशन ठेवले होते. या सेशनमध्ये तैमूर हा चॉकलेट एगशेल बनवताना दिसला असून त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, सैफ अली खान त्याचा आगामी चित्रपट ‘भुत पोलीस’च्या चित्रीकरणासाठी धर्मशाळा येथे गेला आहे. सैफसोबत वेळ घालवण्यासाठी करीना आणि तैमूर दोघे धर्मशाळा येथे त्याच्यासोबत गेले आहेत. अनेकदा खान कुटूंबीय एकत्र वेळ घालवतााना दिसतात. करीना धर्मशाळा येथील आणि तिच्या लाडक्या लेकाचे तैमूरचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.