24 February 2021

News Flash

तैमूरने काढला हातावर टॅट्यू, वाढदिवशी व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ..

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खानचा मुलगा तैमूर अली खान सतत चर्चेत असतो. आज २० डिसेंबर रोजी तैमूरचा चौथा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे तैमूरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान तैमूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तैमूरच्या हातावर टॅट्यू काढत असल्याचे दिसत आहे.

तैमूरचा हा व्हिडीओ त्याच्या फॅन पेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तैमूर शांत उभा आहे आणि एक व्यक्ती त्याच्या हातावर टॅट्यू काढून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तैमूर अतिशय क्यूट दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे.

आणखी वाचा : सैफ अली खानने काढला नवा टॅट्यू?

तैमूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. तैमूर हा बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टारकिड एक आहे. त्याचे व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी तैमूरने धर्मशाळा येथे मातीचे भांडे आणि स्वयंपाक बनवताचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता त्याचा हातावर टॅट्यू काढतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 6:50 pm

Web Title: taimur ali khan got tattoo on his hands video viral on avb 95
Next Stories
1 मलायकाचा हॉट फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…
2 ‘मर्डर-२’मधील अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत, पती आहे कॉमेडियन
3 कपिल शर्माची ऑफस्क्रीन मस्ती पाहिलीत का? पाहा व्हिडीओ
Just Now!
X