29 September 2020

News Flash

सुनील ग्रोवर तैमूर बद्दल म्हणतो…

सुनीलला तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होण्याबाबत विचारण्यात आले होते

कलाविश्वातील सध्याचा सर्वात लोकप्रिय स्टारकिड म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि करिना कपूरचा छोटा नवाब तैमूर अली खान. तैमूर वयाने लहान असला तरी त्याची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्याला लाजवेल इतकी आहे. तैमूरच्या छोट्या छोट्या गोष्टी टिपण्यासाठी फोटोग्राफर त्याच्या मागे फिरत असतात. पण तैमूर देखील त्यांना ‘हाय’ आणि ‘बाय’ करताना दिसत असतो. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना देखील तैमूर सुपरस्टार असल्याचे वाटत आहे.

‘भारत’ चित्रपटातील कलाकार सुनील ग्रोवरचा तैमूर लाडका असल्याचे एका मुलाखतीमध्ये समोर आले आहे. या मुलाखतीमध्ये सुनीलला ‘भारत’ चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर सुनीलला तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होण्याबाबत विचारण्यात आले. तैमूर हा कमी वयातच स्टार झाला आहे. त्याची लोकप्रियता प्रचंड आहे आणि तो इतरांपेक्षा वेगळे असल्याचे त्याने म्हटले.

‘तैमूर हा लहानपणापासूनच स्टार आहे, सुपरस्टार. तैमूरभोवतीचे वलय हे इतरांपेक्षा फार वेगळे आहे’ असे सुनील म्हणाला. तैमूरच्या बाहुल्यादेखील बाजारात विक्रिसाठी आहेत असे तो देखील म्हणाला.

सध्या तैमूर त्याची आई करिना कपूर खान आणि वडिल सैफ अली खान यांच्यासह सुट्यांचा आनंद लुटण्यासाठी परदेशात गेला आहे. त्याचे सुट्यांचा आनंद लुटतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या मुलाचा अबरामचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी शाहरुखने मोठ्या बर्थ डे पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला तैमुरनेदेखील हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये तैमुरने टेम्पररी टॅटू काढला होता. त्याचा हा टॅटू चाहत्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले असून त्याचे फोटो व्हायरल झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 12:04 pm

Web Title: taimur ali khan is born as a superstar says sunil grover avb
Next Stories
1 ‘वयाने मोठा पुरुष साथीदार चालतो मग स्त्री का नाही?’, प्रियांकाचा सवाल
2 सासऱ्यांच्या आठवणीत भावूक झालेली काजोल म्हणते…
3 सलमानच्या ‘भारत’ची पहिल्याच दिवसात दणक्यात कमाई
Just Now!
X