News Flash

हा तैमुर नाही, मग कोण?; या चिमुकल्याला तुम्हीच ओळखा…

हा चिमुकला हुबेहूब तैमुरसारखा दिसत आहे

हा तैमुर नाही, मग कोण?; या चिमुकल्याला तुम्हीच ओळखा…

बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत ज्यांच्या कुटुंबाने कलाविश्वामध्ये फार मोठं योगदान दिलं आहे. यातलीच एक कुटुंब म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर-खान. या दोघांच्याही कुटुंबाचं कलाविश्वात भरीव योगदान आहे. सैफची आई शर्मिला टागोर या ७० च्या दशकातील नावाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यानंतर सैफ अली खान हादेखील कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. परंतु सध्या त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रियता त्याची मुलं सारा अली खान आणि तैमुर अली खानला मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर खान कुटुंबातील एका चिमुकल्याचा फोटो व्हायरल होत असून या फोटोत दिसणारा चिमुकला सैफ अली खान आहे की तैमुर आहे हे ओळखणं कठीण झालं आहे.

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आता इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय झाली असून ती तैमुरसोबतचे अनेक फोटो शेअर करत आहे. यामध्येच तिने तैमुरच्या फोटोसोबत आणखी एका लहान मुलाचा फोटो एडिट करुन शेअर केला आहे. विशेष म्हणजे तैमुरसोबत असलेला हा लहान मुलगा हुबेहूब त्याच्याप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे हा तैमुर आहे की आणखी कोणी असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र हा फोटो तैमुरचा नसून खुद्द सैफ अली खानचा आहे.

 

View this post on Instagram

 

Saif or Taimur ???? #likefatherlikeson

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

करीनाने सैफच्या बालपणीचा आणि तैमुरचा फोटो एडिट करुन शेअर केला आहे. यात सैफ आणि तैमुर हुबेहूब एकमेकांप्रमाणेच दिसत आहेत. त्यामुळे तैमुर हा वडिलांची कार्बन कॉपी असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

वाचा : … तर कंगना अभिनय सोडून देईल; रंगोली चंडेलचं ओपन चॅलेंज

दरम्यान, दिवसेंदिवस तैमुरच्या लोकप्रियतेत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. तैमुर कुठेही दिसला तरी चाहते त्याचे फोटो काढण्यासाठी पुढे सरसावतात. त्यामुळे बऱ्याचदा सैफने तैमुरला एवढ्या लहान वयात या सगळ्याची सवय लावू नका अशी विनंतीही केल्याचं पाहायला मिळालं आहे. सैफ सध्या त्याच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. लवकरच तो जवानी जानेमन या चित्रपटात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2020 9:32 am

Web Title: taimur ali khan is copy of young saif ali khan childhood photo viral ssj 93
Next Stories
1 तनुश्री दत्तावर २५ कोटींचा मानहानीचा दावा; नाना पाटेकर यांची ‘नाम’ न्यायालयात
2 … तर कंगना अभिनय सोडून देईल; रंगोली चंडेलचं ओपन चॅलेंज
3 #Coronavirus : ‘सूर्यवंशी’चं प्रदर्शन लांबणीवर
Just Now!
X