News Flash

“तैमूरला रामायण आवडते आणि तो स्वत:ला श्रीराम समजतो”

सैफने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खानचा मुलगा तैमूर सतत चर्चेत असतो. इतक्या कमी वयात तैमूरची लोकप्रियता प्रचंड आहे. सोशल मीडियावर सतत त्याचे फोटो व्हायरल होत असतात. नुकताच सैफने एका मुलाखतीमध्ये तैमूरची एक मजेशीरबाब सांगितली आहे. त्याला रामायण पाहायला आवडत असून तो स्वत:ला प्रभू श्रीराम समजत असल्याचे सैफने सांगितले आहे.

नुकताच सैफने रेडिफला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला तैमूर विषयी काही खास गोष्टी विचारण्यात आल्या होत्या. तैमूरला गाणे गायला, डान्स करायला आणि चित्र काढायला प्रचंड आवडत असल्याचे सैफने सांगितले. ‘मी बऱ्याच वेळा तैमूरच्या हातात क्रिकेटची बॅट देऊन त्याच्यासोबत क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला. त्याला क्रिकेट किंवा फूटबॉल खेळायला आवडत नाही. सध्या तैमूरला तो प्रभू श्रीराम आहे असे वाटत आहे. त्याला रामायण पाहायला आवडते’ असे सैफ म्हणाला.

 

View this post on Instagram

 

Any place in the IPL? I can play too

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

डिसेंबर महिन्यात तैमूर चार वर्षांचा होणार आहे. करीना आणि सैफने काही दिवसांपूर्वीच ते पुन्हा आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली होती. सध्या तैमूर दिल्लीमध्ये आहे. तेथे करीना तिचा आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढाचे चित्रीकरण करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 5:24 pm

Web Title: taimur ali khan loves to watch ramayana considers himself lord ram avb 95
Next Stories
1 ‘पेड न्यूज चालतात पण प्रेक्षकांचे प्रश्न नाही’; बॉलिवूड कलाकारांवर विवेक अग्निहोत्री संतापला
2 बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती
3 ‘अतरंगी रे’च्या दोन आठवड्यांच्या शुटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतके मानधन
Just Now!
X