नेहमीच आपल्या क्यूट फोटोंनी सोशल मीडियाचा फेवरेट झालेला तैमुरचा अजून एक फोटो व्हायरल झाला आहे. त्याचा हा फोटो पाहून तुम्हीही त्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. या फोटोमध्ये तैमुरची पोनी टेल दिसते. पोनी घातलेला तैमुर बाबांच्या फोटोकडे एक टक पाहताना दिसत आहे. वडिलांच्या फोटो फ्रेमकडे पाहतानाचा तैमुरचा हा फोटो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. स्टार किडमध्ये सर्वात जास्त चर्चा होणाऱ्या मुलांच्या यादीत तैमुरचे नाव अग्रणी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ सध्या कामानिमित्त राजस्थानमध्ये आहे. यामुळेच तैमुरला आपल्या बाबांची फार आठवण येत आहे. बाबांच्या आठवणीत तो सैफचा फोटो अनेकदा पाहत बसतो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तैमुरने पांढऱ्या रंगाचा पायझमा आणि निळ्या रंगाचे टी- शर्ट घातले आहे. त्याच्या पाठीमागे चार्ट पेपर लावलेले दिसत आहेत. करिना कपूरच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवरून हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

अपघात टाळायचा असेल तर ही बातमी वाचाच!

काही महिन्यांपूर्वी तैमुर एक वर्षाचा झाला. आता तो प्ले-स्कूलमध्येही जाऊ लागला आहे. सैफने एका मुलाखतीत म्हटले की, ‘कधी तैमुर करिनासारखा दिसतो तर कधी माझासारखा दिसतो. तो करिनाचे चायनिज व्हर्जन आहे.’ यावर करिना म्हणते की, ‘तैमुर माझ्या आणि सैफ दोघांसारखाही दिसतो. पण तो जास्त माझ्यासारखा दिसतो, त्यातही कपूर घराण्यातील सदस्यांसारखा दिसतो. तो खूपसा माझ्या बाबांसारखा दिसतो.’