News Flash

तैमूर आहे १००० चौरस फूट बागेचा मालक

जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक म्हणजे करीना कपूर खानचा मोठा मुलगा तैमूर अली खान. तैमूर सगळ्यात लहान असला तरी चाहत्यांच्या संख्येत तो करीनाच्या पाठी नाही. तैमूरचे ही लाखो चाहते आहेत. तैमूरचा जन्म २० डिसेंबर २०१६ रोजी झाला होता. त्याच्या जन्माच्या काही क्षणातच त्याचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याच्या नावावरून तर सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. दरम्यान, तैमूर अजून ४ वर्षांचा असून त्याच स्वत:च एक जंगल आहे.

‘नवभारत टाईम्सने’ दिलेल्या वृत्तानुसार, तैमूर अली खानची १०० झाडे असलेली १००० चौरस फीटची एक बाग आहे. त्या बागेच्या प्रवेश द्वारावर ‘तैमूर अली खान पतौडी फॉरेस्ट’ असं लिहीलेली एक पाटी दिसते.

करीनाची न्युट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरने तैमूरच्या पहिल्या वाढदिवशी त्याला भेट म्हणून ही बाग दिली. त्यावेळी तिने या बागेचा फोटो देखील शेअर केला. या बागेत १०० वेगवेगळी झाडे आहेत. ३ जांभळाची झाडे, १ फणसाचे झाडं, १ आवळ्याच झाडं, ४० केळीची झाडे, १४ शेवग्याची झाडे, १ कोकमचं झाडं, १ पपईच झाडं, ५ सीताफळाची झाडे, २ रामफळाची झाडे, २ लिंबाची झाडं आहेत. फळांसोबत ३ वेगवेगळ्या डाळी लावण्यात आल्या आहेत. तर मिर्ची, आलं, हळदं आणि कडीपत्याची देखील झाडं आहेत. फुलांमध्ये झेंडुच्या फुलांची छोटी बाग करण्यात आली आहे. पालेभाज्या देखील लावण्यात आल्या आहेत.

दरम्यान, करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाला फेब्रुवारीमध्ये जन्म दिला आहे. करीना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या मुलाबद्दल कोणतीही माहिती त्यांच्या चाहत्यांना दिलेली नाही. करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाचा फोटो आणि चाहत्यांसोबत लवकरात लवकर शेअर करावा अशी इच्छा तिचे चाहते सतत व्यक्त करताना दिसतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 4:32 pm

Web Title: taimur ali khan owns a 1000 sq ft forest photo viral on social media dcp 98
Next Stories
1 केएल राहुलच्या वाढदिवशी अथिया शेट्टीची ‘खास’ पोस्ट व्हायरल
2 छोट्या पडद्यावरचा ‘हा’ कलाकार लवकरच दिसणार आलिया भटसोबत!
3 लॉकडाउनमुळे घरातच वाढदिवस झाला; रामायणातील सीता सरकारवर नाराज
Just Now!
X