21 September 2020

News Flash

Photo : आता तैमुरसोबत तुमचीही चिमुकली मंडळी खेळू शकणार

तैमुरप्रमाणे ही खेळणीही लोकप्रिय होत आहेत.

तैमुर

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री करिना कपूर-खानचा लाडका लेक तैमुर जन्माला आल्यापासून स्टारडम उपभोगत आहे. त्यामुळे आपल्या सेलिब्रेटी आई-वडीलांप्रमाणेच त्यालादेखील प्रसिद्धीची आणि कॅमेराची सवय झाली आहे. त्यातच हसत-हसत कॅमेरासमोर जाणाऱ्या तैमुरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. ही लोकप्रियता आता कमालीची वाढली असून बाजारामध्ये चक्क त्याच्या सारखीच दिसणारी खेळणी आली आहेत.

अश्विनी यार्डी यांनी सोशल मीडियावर एका खेळण्याचा फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये असलेला बाहुला हा हुबेहूब तैमूरसारखा दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र या बाहुल्याची चर्चा सुरु असून तैमुरप्रमाणे हा बाहुलाही लोकप्रिय होत आहे.

तैमुरसारखा दिसणारा हा बाहुला केरळमधील एका दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं अश्विनी यार्डी यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, तैमुरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून त्याचे फोटोदेखील मोठ्या किंमतीला विकले जात असल्याचं समोर आलं आहे. तैमुरच्या एका फोटोसाठी फोटोग्राफर्स १५०० रुपये आकारतात असं खुद्द सैफ अली खानने सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर ही रक्कम कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा जास्त असल्याचं तो सांगतो. सैफने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. या शोमध्ये त्याने अनेक मजेशीर गोष्टी सांगितल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 12:26 pm

Web Title: taimur ali khan stardom toy market pictures social media
Next Stories
1 #MeToo : रिचा चड्ढाचा कोरिओग्राफरसोबतचा ‘तो’ अनुभव थक्क करणारा
2 Video : दीपिका -रणवीरचा ‘तो’ व्हिडिओ पुन्हा व्हायरल
3 PHOTO: सुबोधने शेअर केला घाणेकरांच्या भूमिकासाठीच्या लूक टेस्टचा फोटो
Just Now!
X