News Flash

‘गूड न्यूज’! आईसोबत तैमूरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री?

'गूड न्यूज' चित्रपटातून करिना कपूर आणि अक्षय कुमार यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

आईसोबत तैमूरची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान फक्त दोन वर्षांचा असला तरी एखाद्या सुपरस्टार इतकाच लोकप्रिय आहे. आता तैमूर बॉलिवूड चित्रपटामध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरू आहे.

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार तैमूर अली खान त्याची आई करिना कपूरच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘गूड न्यूज’ असे असणार आहे. तसेच चित्रपटात करिनासह अक्षय कुमार, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांज देखील असणार आहे.

काही दिवसांपूर्वी तैमूर आणि कियारा यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ ‘गूड न्यूज’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच तैमूर चित्रपटात करिना आणि अक्षय कुमारसह दोन दृश्यांमध्ये दिसणार असल्याचे सूत्रांनुसार समोर आले आहे.

तैमूर अली खान हा केवळ २ वर्षांचा आहे. एखाद्या स्टार किडला इतक्या कमी वयात इतकी जास्त लोकप्रियता मिळवणे हे फार क्वचितच ऐकायला मिळते. सध्या बाजारात तैमूरचे कुकिज आणि खेळणे विक्रीसाठी असल्याचे पहायला मिळते.

‘गूड न्यूज’ चित्रपटातून करिना कपूर आणि अक्षय कुमार यांची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. तसेच चाहते या चित्रपटासाठी फार उत्सुक असल्याचे समोर आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 7:38 pm

Web Title: taimur ali khan to make his bollywood debut in mom kareena kapoor khan movie
Next Stories
1 बॉलिवूडमधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक्स’चा समावेश
2 देसी गर्ल होणार सुपरगर्ल?, ‘माव्‍‌र्हल’ची प्रियांकाशी बोलणी सुरू
3 ‘साथ दे तू मला’ मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांची पसंती
Just Now!
X