19 January 2020

News Flash

‘लाल कप्तान’चा ट्रेलर पाहून तैमुरने दिली ही प्रतिक्रिया

या चित्रपटामध्ये सैफचा लूक अंगावर काटा आणणारा आहे

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा आगामी ‘लाल कप्तान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सैफ नागा साधूंच्या रुपात दिसणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या चित्रपटामध्ये सैफचा लूक अंगावर काटा आणणारा आहे. मात्र त्याचा हा लूक तैमुरला प्रचंड आवडला असून तो वारंवार हा ट्रेलर पाहण्याची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.

‘लाल कप्तान’चा ट्रेलर पाहून तैमुरची रिअॅक्शन नेमकी कशी असते हे सैफने नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलं. ‘लाल कप्तान’ या चित्रपटामध्ये माझा लूक अंगावर काटा आणणारा आहे. त्यामुळे तैमुरने हा चित्रपट किंवा त्याचा ट्रेलर पाहू नये असं आम्हाला वाटत होतं. मात्र दररोज रात्री झोपण्यापूर्वी लाल कप्तानचा ट्रेलर पाहण्याची मागणी तो करु लागला’, असं सैफ म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘सुरुवातीला तैमुर जेव्हा आम्हाला सांगायचा की मारामारीचा ट्रेलर दाखवा तेव्हा आम्हाला वाटायचं की तो ‘तानाजी’ चित्रपटाबद्दल सांगतोय.  मात्र त्याला ‘लाल कप्तान’ पाहायचा असल्याचं त्याने सांगितलं. यावरुन तैमुरला सुद्धा लाल कप्तान आवड असल्याचं आमच्या लक्षात आलं. विशेष म्हणजे तो दिवसातून २ वेळा तरी हा ट्रेलर पाहतो’.

दरम्यान, ‘लाल कप्तान’मध्ये सैफ नागा साधूच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्या व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, दीपक डोबरियाल, मानव विज आणि झोया हुसैन ही कलाकारमंडळी झळकणार आहेत. ‘लाल कप्तान’ हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करत आहेत. तसेच या चित्रपटाची संपूर्ण कथा नागा साधू यांचा जीवनाभोवती फिरताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील सैफची भूमिका ही त्याच्या आता पर्यंतच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका असणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

First Published on October 16, 2019 11:43 am

Web Title: taimur ali khan watches laal kaptaan trailer twice a day ssj 93
Next Stories
1 रणवीर-सैफला मराठमोळ्या ‘दर्शन’नं केलं अलाऊद्दीन खिल्जी-नागा साधू
2 Photo: …म्हणून ऐश्वर्याच्या मोबाइल कव्हरवर आहे ‘ARB’ ही इंग्रजी अक्षरे
3 ‘गायींकडे लक्ष देण्यापेक्षा महिलांकडे बघा’, मिस कोहिमा स्पर्धेतील तरूणीने मोदींना सुनावले
Just Now!
X