News Flash

पाहा तैमुरने आई-बाबांसाठी तयार केलेला बाप्पा; फोटो होतोय व्हायरल

तैमुरने अनोख्या अंदाजात दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं. राजकिय मंडळींपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र यामध्ये सेलिब्रिटी किड तैमुरने दिलेल्या शुभेच्छा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्याने आपल्या आई-बाबांसाठी चक्क लेगो ब्लॉक्सच्या मदतीने गणरायाची मूर्ती तयार करुन अनोख्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

करिना कपूरने आपल्या लाडक्या मुलाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोत तैमुर गणरायाच्या भक्तीत तल्लीन झालेला दिसत आहे. या फोटोद्वारे तैमुरच्या वतीने करिनाने देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “यंदाचं गणेशोत्सव सेलिब्रेशन नेहमीपेक्षा वेगळं होऊ शकतं. तैमुरने आमच्यासाठी गणेशाची एक सुंदर मुर्ती तयार केली आहे. आनंदात कुठलीही कमतरता भासता कामा नये. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.” अशा आशयाची कॉमेंट करिनाने या फोटोवर केली आहे. तैमुरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर लाइक्स आणि कॉमेंट केल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 5:14 pm

Web Title: taimur lego ganpati kareena kapoor saif ali khan ganesh chaturthi 2020 mppg 94
Next Stories
1 …म्हणून निपुण धर्माधिकारीकडे करतात चांदीच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा
2 VIDEO : अजय देवगणने अनोख्या पद्धतीने दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
3 सुशांत सिंह मृत्यूप्रकरण : ‘आतून आवाज आला तर काम थांबव’; चावीवाल्याने केला धक्कादायक खुलासा
Just Now!
X