News Flash

ट्रोल करण्यासाठी आली तैमुरची अजून एक बातमी

फार कमी वेळा तैमुरला लोकांनी रडताना पाहिले आहे

ट्रोल करण्यासाठी आली तैमुरची अजून एक बातमी

काही दिवसांपूर्वी करिना कपूर मुलगा तैमुरसोबत अमृता अरोराच्या घरी गेली होती. अमृताच्या घराखालचे करिना- तैमुरचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीते व्हायरल होत आहेत. त्याच्या या फोटोला ट्रोलही केले जात आहे. साधारणपणे तैमुरचे फोटो शेअर केले गेले की त्याचा द्वेष करणारे त्याच्याविरोधात कमेंट लिहायला सुरूवात करतात. यावेळीही त्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. अमृताच्या घरी जाताना तैमुर हसत- खेळत होता. मात्र तिच्या घरुन त्याला कदाचित निघायचे नव्हते, म्हणून की काय तैमुरने आईकडे भोकाड पसरलं होतं. तो गाडीत खूप वेळ रडत होता.

तैमुरला शांत करण्यासाठी करिनाने त्याला मनवण्याचा खूप प्रयत्न केला. पण तैमुरचे रडणे काही थांबतच नव्हते. त्याचे रडणे थांबवण्याचा प्रयत्न करताना करिना मात्र हसताना दिसली. बाळाचे रडणे थांबवण्यासाठी तिने तैमुरच्या हातात एक डबाही दिला, पण तरीही तैमुरचे रडणे काही थांबत नव्हते.

तैमुर नक्की कशासाठी रडत होता हे मात्र कळू शकले नाही. फार कमी वेळा तैमुरला लोकांनी रडताना पाहिले आहे. तो नेहमीच प्रसारमाध्यमांसमोर हसताना दिसतो. त्यामुळे यावेळी नक्की काय कारण होतं की अमृताच्या घरून निघताच तो रडायला लागला हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना सतावत आहे.

याआधी एकदा विमानतळावर तैमुरचे रडणे साऱ्यांनी पाहिले होते. करिनाच्या कडेवर असलेला गोंडस तैमुर रडतानाही फार मोहक दिसत होता. एवढ्या लहान वयात तैमुरची लोकप्रियता ही पाहण्यासारखी आहे. हल्ली तर दररोज तैमुरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 6:27 pm

Web Title: taimur spotted crying badly while mommy kareena pacifying her son photos viral
Next Stories
1 प्रेमला मिळणार का राधाची साथ?
2 ‘..तर मी माझं ट्विटर अकाऊंटच डिलीट करेन’
3 १० वर्षांनंतर उर्मिला मातोंडकर करणार ‘बेवफाई’
Just Now!
X