News Flash

‘टकाटक’ फेम रितीका आता नव्या भूमिकेत

साकारणार 'डार्लिंग'

रितिका श्रोत्री

गतवर्षा प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक’ या बॉक्स ऑफिसवर यशस्वी झालेल्या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीला एक गोड चेहरा दिला. या चेह-यानं एंट्रीलाच प्रेक्षकांवर मोहिनी घालत आपल्या अनोख्या अभिनयशैलीचा जलवा दाखवला आहे. ही अभिनेत्री आहे रितीका श्रोत्री. आपल्या पहिल्याच सिनेमात सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी रितीका आता ‘डार्लिंग’ बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी काही दिवसांपूर्वाच आपल्या ‘डार्लिंग’ या आगामी मराठी सिनेमाची घोषणा करत लक्षवेधी मोशन पोस्टर रिलीज केलं होतं. पदार्पणातच रितीकानं केलेला अभिनय आणि आपल्या व्यक्तिरेखेला दिलेला अचूक न्याय यामुळे ‘डार्लिंग’मध्ये ती नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. या सिनेमाच्या सोशल पेजवर एका तरूणीचा क्लॅप हाती घेतलेला परंतु चेहरा दिसत नसलेला फोटो टाकण्यात आला होता, त्यामुळे ही अभिनेत्री नेमकी कोण याबाबत सगळीकडे चर्चा रंगू लागली होती. आता या रहस्यावरून पडदा उठला आहे. रितीकाच ती अभिनेत्री असल्याचं ‘डार्लिंग’च्या साँग टिझरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे रितीका प्रेक्षकांना पुन्हा एकदा एका नव्या रूपात भेटणार आहे. सुप्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश यांच्या संगीताची जादू या चित्रपटाद्वारे संगीतरसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

आणखी वाचा- अग्गंबाई सासूबाई : सोहमच्या बेलगाम वागण्याला आसावरी देणार चपराकीने उत्तर 

रितीकानं ‘टकाटक’ सिनेमात एक गावरान व्यक्तिरेखा साकारली होती. त्या व्यक्तिरेखेसाठी आवश्यक असलेला भाषेचा लहेजा आणि देहबोलीसोबतच तिने अभिनयातही यथोचित बदल घडवत आपली भूमिका साकारली होती. रितीकाला ‘डार्लिंग’मध्ये पुन्हा एकदा एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्याची संधी मिळणं हे त्याचंच फलित आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघे-या’ या वेगळ्या वाटेनं जाणा-या सिनेमानंतर ‘डार्लिंग’च्या निमित्ताने दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी एका नवा जॉनर हाताळला आहे. या सिनेमात रितीकाचा नायक कोण असेल ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 2:14 pm

Web Title: takatak fame ritika shrotri upcoming marathi movie darling ssv 92
Next Stories
1 अग्गंबाई सासूबाई : सोहमच्या बेलगाम वागण्याला आसावरी देणार चपराकीने उत्तर
2 ‘बधाई हो’च्या सीक्वेलमध्ये दिसेल ‘ही’ हटके जोडी
3 मराठी मालिकेच्या शीर्षकगीतावर शिल्पाचा टिक-टॉक अंदाज, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X