01 March 2021

News Flash

सई मांजरेकर नव्या रुपात, सलमानने शेअर केला व्हिडिओ

सध्या तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे

काही दिवसांपूर्वी सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातून अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून सलमान आणि सईची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. या पहिल्यावहिल्या चित्रपटानंतर सईला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता सई पुन्हा एकदा एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकताच सलमानने एक व्हिडीओ त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सई अत्यंत सुंदर आणि वेगळ्या अंदाजात दिसत आहेत. हा व्हिडीओ म्हणजे सईचा एक नवा म्यूझिक व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये सई सोबत बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा देखील दिसणार आहे. या म्यूझिक व्हिडीओचे नाव ‘मांझा’ असे आहे.

आणखी वाचा : ‘तो माझा निर्णय नव्हता’ महेश मांजरेकरांचा खुलासा

सई आणि आयुष पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. ‘मांझा’ या गाण्यामध्ये आयुष घराच्या गच्चीवर पतंग उडवणाऱ्या सईच्या प्रेमात असल्याचे दिसते. तो त्याच्या मनातील गोष्ट पंतगीच्या माध्यमातून सई पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ‘मांझा’ हे गाणे विशाल मिश्रा आणि अक्षय त्रिपाठीने लिहिले आहे. गाण्यातील सई आणि आयुषची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 11:11 am

Web Title: talented marathi starkid saiee manjrekar in a romantic music video avb 95
Next Stories
1 हनिमूनसाठी गेलेल्या पराग कान्हेरेला नेटकऱ्यांनी दिला ‘हा’ सल्ला
2 ‘मुगल ए आझम’चा या भाषेतही केला होता रिमेक,पण…
3 ‘घाडगे & सून’ फेम भाग्यश्री व भूषण प्रधानमध्ये नेमकं काय शिजतंय?
Just Now!
X