कधी अल्लड कवितांमध्ये गुंतलेली ‘कुहू’, तर कधी स्त्री शिक्षणांचा पाया घालणाऱ्या रमाबाई रानडे, कधी ‘समुद्र’ नाटकातील खंबीर पत्नी अशा वेगवेगळय़ा व्यक्तिरेखांतून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री स्पृहा जोशी येत्या शनिवारी ठाणेकरांशी मनमोकळय़ा गप्पा मारणार आहे. कवी, लेखिका, अभिनेत्री या क्षेत्रांत आपला ठसा उमटवत असलेल्या या गुणवान अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्यासाठी लोकमान्य आळी, श्री गणेशोत्सव मंडळाने तिच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हर्षदा बोरकर यावेळी स्पृहाची प्रकट मुलाखत घेतील.
’कधी-शनिवार, २६ सप्टेंबर रोजी वेळ-रात्री ८.३०
’कुठे- लोकमान्य आळी, अहिल्यादेवी बागेजवळ, चरई ठाणे (प.)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 25, 2015 7:49 am