27 November 2020

News Flash

Video : …म्हणून करोनावर मात करणाऱ्या तमन्ना भाटियाची होतीये चर्चा

पाहा, तमन्नाचा चर्चेत आलेला व्हिडीओ

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने अलिकडेच करोनावर यशस्वीरित्या मात केली. करोनाची लागण झाल्यामुळे तमन्ना हैदराबादमधील एका रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र, करोनावर मात केल्यानंतर तिला डिस्चार्ज मिळाला असून ती घरी परतली आहे. विशेष म्हणजे घरी परतल्यानंतर तमन्ना तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

रुग्णालयातून घरी परतलेली तमन्ना तिच्या डेली रुटीनकडे पुन्हा वळली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती वर्कआऊट करताना दिसत आहे. त्यामुळे करोनावर मात केल्यानंतर तमन्ना पुन्हा तिच्या फिटनेसकडे वळल्याचं दिसून येत आहे.

“पुन्हा फिट होण्यासाठी मला लहान मुलांप्रमाणे हळूहळू पुढे जावं लागणार आहे. करोना विषाणूवर मात केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं उचलेलं पाऊल. पण वर्कआऊट तितकंच करा जितकं तुमच्या शरीरासाठी गरजेचं आहे”, अशी कॅप्शन तमन्नाने या फोटोला दिली आहे.

दरम्यान, तमन्ना लवकरच ‘बोले चुडियाँ’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी स्क्रीन शेअर करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 10:27 am

Web Title: tamanna bhatia did workout after won battle against coronavirus video viral on internet ssj 93
Next Stories
1 बडोद्याच्या दांडियाची आठवण
2 ‘सुपर वुमन’! ड्रीमगर्लला मुलीने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
3 प्रेमासाठी त्यांनी ओलांडला ‘उंबरठा’; स्मिता पाटील यांची लव्हस्टोरी
Just Now!
X