News Flash

बोले चुडिया चित्रपटातून मौनी रॉयची हकालपट्टी, ही अभिनेत्री नवाजसह झळकणार

हा चित्रपट एक रोमॅण्टिक ड्रामा असणार आहे

गेल्या काही दिवसापासून बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बोले चुडिया’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात नवाजसह ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी दिसणार होती. परंतु काही कारणास्ताव या चित्रपटातून मौनीची गच्छंती करण्यात आली होती. मौनीनंतर या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

‘बोले चुडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शमास सिद्दीकी करणार असून या चित्रपटातून तो दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. शमासने त्याच्या ट्विटर अकाऊंडवरून ‘बोले चुडिया’ चित्रपटात बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया नवाजसह मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे सांगितले आहे. ‘अखेर माझा शोध संपला. सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री तमन्ना भाटियाचे बोले चुडियाच्या कुटुंबामध्ये स्वागत’ असे शमासने ट्विट केले आहे.

तमन्नाने देखील या चित्रपटात काम करण्याचा आनंद ट्विचरद्वारे व्यक्त केला आहे.

Next Stories
1 अभिजीत बिचकुलेचा बिग बॉसमध्ये परतीचा मार्ग बंद ? जामीन न्यायालयाने फेटाळला
2 ‘या’ क्रिकेटपटूला डेट करते सुनील शेट्टीची मुलगी
3 हिरोंच्या गर्लफ्रेंड्समुळे गमावले ३० सिनेमे – मल्लिका शेरावत
Just Now!
X