21 November 2019

News Flash

चिरंजीवीच्या सुनेने तमन्नाला दिलेल्या भेटवस्तूची किंमत ऐकून व्हाल थक्क

उपासनाने तमन्नाचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत याबाबत माहिती दिली.

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिचा ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा चित्रपट सध्या सिनेमागृहांमध्ये अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात तमन्नाने केलेल्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रचंड स्तुती केली जात आहे. दरम्यान अभिनेता राम चरणची पत्नी उपासना हिने देखील तमन्नावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. उपासना ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाची सहाय्यक निर्माती आहे. आश्चर्याची बाब म्हणजे उपासना इतर निर्मात्यांप्रमाणे केवळ कौतुक करुन थांबली नाही तर, तिने चक्क एक हिऱ्याची अंगठी तमन्नाला भेट म्हणून दिली आहे. या अंगठीची किंमत जवळपास दोन कोटी असुन त्या अंगठीत बसवलेला हिरा जगातील सर्वात मोठ्या पाच हिऱ्यांपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे.

उपासनाने तमन्नाचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत याबाबत माहिती दिली. “स्ये रा नरसिम्हा रेड्डी या चित्रपटाच्या निर्मातीकडून तमन्नाला एक लहानशी भेट” अशा शब्दात ट्विट करत तिने तमन्नाचे कौतुक केले आहे.

इतिहासाची पाने उलगडणारा ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’

या चित्रपटात तमन्ना बरोबरच दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’ हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटाची संपूर्ण कथा १८४७ रोजी ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढलेल्या नरसिम्हा रेड्डी व त्यांच्या साथीदारांवर आधारित आहे.

First Published on October 9, 2019 12:35 pm

Web Title: tamanna bhatia ram charan wife gifts 5th biggest diamond mppg 94
Just Now!
X