‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक्स’च्या यशानंतर अभिनेता विकी कौशल हा चांगलाच चर्चेत आला आहे. तरुणींमध्ये लोकप्रिय झालेल्या विकीनं अभिनेत्री तमन्ना भाटियालाही भुरळ घातली आहे. एका मुलाखतीत तिनं चक्क विकीसोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

विकी हरलीन सेठीला डेट करत होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. कतरिना कैफमुळे हे ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होत मात्र यामागे कतरिना नसून भूमी पेडणेकर असल्याचं समोर आलं आहे. विकीची भूमीसोबतची वाढती जवळीक हरलीनला खटकत होती तसेच विकीनं एका मुलाखतीत कतरिनासोबत डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती याकारणामुळे दोघांचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात होतं.

आता विकी सिंगल असल्याचं म्हटलं जात आहे तेव्हा अभिनेत्री तमन्नानं विकीसोबत  डेटवर जायला आवडेल असं म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तमन्नाला विकी काय उत्तर देणार? तिच्यासोबत डेटवर जाण्यास विकी तयार होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.