‘बाहुबली’ या चित्रपटामुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास याचा वाढदिवस आहे. प्रभास ३६ व्या वर्षात पदार्पण करणार असून वाढदिवसानिमित्त प्रभासवर सोशल मिडीयावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे सध्या ट्विटरवर #HappyBirthdayPrabhas हा टॅग ट्रेंड होत आहे. दरम्यान, प्रभासने गुरूवारी रात्री अभिनेत्री तमन्ना आणि राणा दग्गुबाटी यांच्याबरोबर वाढदिवस साजरा केला. तमन्नाने बाहुबली चित्रपटात अवंतिका या राजकन्येची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर उचलून धरला होता. आधी फक्त तेलुगू सिनेमांपुरती मर्यादित ओळख असलेला प्रभास ‘बाहुबली’च्या भूमिकेमुळे बॉलिवूडसह जगभरात पोहोचला.
प्रभासने २००२ मध्ये ‘ईश्वर’ या चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ‘राघवेंद्र’ , ‘वर्षम’ आणि ‘छत्रपती’ यांसारख्या चित्रपटांमुळे प्रभास दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर प्रभासने ‘अॅक्शन जॅक्सन’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, प्रभासला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘बाहुबली’ या चित्रपटामुळे. या भूमिकेसाठी प्रभासने प्रचंड मेहनत घेतली होती.

Happy birthday to my dearest Pubsi #aboutlastnight @kksenthilkumar @ranadaggubati @baahubalimovie

A photo posted by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on

Happy birthday to my favourite Pubsi !!!! Have an awesome year ahead @baahubalimovie

A photo posted by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks) on