04 March 2021

News Flash

लॉकडाउनमध्ये जुगार खेळणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी सापळा रचून विद्यार्थ्यांना लुबाडणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश; कारवाईत या अभिनेत्याला देखील झाली अटक

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता शाम याला लॉकडाउनमध्ये जुगार खेळल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईमधील अपस्केल ननगम्बकम येथील एका बंगल्यात शाम आपल्या ११ साथीदारांसोबत जुगार खेळत होता. त्यावेळी पोलिसांनी अचानक धाड टाकून या मंडळींना अटक केली. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार या अटकेदरम्यान पोलिसांनी अनेक अवैद्य वस्तू देखील जप्त केल्या आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक दिवसांपासून ते टोळीच्या मागावर होते. या टोळीने व्हिडीओ गेमच्या नावाखाली आतापर्यंत अनेक लोकांना लुबाडले आहे. गेल्या काही काळात कॉलेजमधील काही विद्यार्थांनी आत्महत्या केल्याच्या घटना या भागात घडल्या होत्या. लक्षवेधी बाब म्हणजे या तरुणांच्या घरातून हजारो रुपयांची चोरी देखील झाली होती. या प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांना या टोळीबाबत माहिती मिळाली. या टोळीनेच त्या विद्यार्थ्यांना गंडवलं होतं असे काही पुरावे त्यांच्या हाती आले आहेत. अखेर सापळा रचून पोलिसांनी या टोळीला पकडलं. या टोळीत एका अभिनेत्याचा देखील सामावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 2:10 pm

Web Title: tamil actor shaam arrested in chennai for gambling mppg 94
Next Stories
1 ‘मी स्वत:चा बॉस आहे’ म्हणत अभिनेत्याचा बिग बॉस १४ला नकार
2 ‘तिला पहिले..’, मुलीच्या बॉलिवूडमधील पदार्पणावर अनुराग म्हणाला
3 “पुरस्कार द्या अन्यथा बहिष्कार टाकेन”; करण जोहरने समिक्षकांना दिली होती धमकी
Just Now!
X