दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थवासी सध्या आर्थिक संकटात आहेत. गेल्या काही काळापासून ते कर्करोगाशी झुंज देत आहेत. उपचारासाठी त्यांना पैशांची गरज आहे. परिणामी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करुन त्यांनी आपल्या चाहत्यांकडे उपचारासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अवश्य पाहा – १७ व्या वर्षी झाली होती मिस इंडिया; बॉलिवूडची ‘दामिनी’ सध्या काय करतेय?
थवासी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक नामांकित कलाकार होते. कीजहक्कु चीमाईले, अन्नथा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. ते आपल्या पिळदार शरीरासाठी प्रसिद्ध होत. परंतु कर्करोगामुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. “मी गेली अनेक वर्ष कर्करोगाशी लढतोय. माझी सर्व संपत्ती मी उपचारासाठी खर्च केली. आजारी असल्यामुळे गेल्या काही वर्षांत मी कामही केलेलं नाही. परिणामी मी आता आर्थिक संकटात सापडलो आहे. कृपया कोणीतरी मला मदतीचा हात द्यावा. मी आजन्म तुमचा ऋणी राहिन.” अशी विनंती त्यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. यापूर्वी देखील आर्थिक संकटात सापडलेल्या अनेक कलाकारांनी मदत मागितली होती. अन् चाहत्यांनी देखील या कलाकारांना मदत केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 17, 2020 2:37 pm