News Flash

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केली आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे हा अभिनेता गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात असल्याचं म्हटलं जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

तामिळ कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते शशीकुमार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तामिळनाडूमधील जोलारपेट्टाई रेल्वे स्थानकाजवळील झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. शशीकुमार यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून तामिळ कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिकांनी शशीकुमार यांचा मृतदेह स्थानिकांनी पाहिल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी शशीकुमार यांच्या पत्नीला बोलावून घटनेबाबत सांगितलं. शशीकुमार यांची पत्नी राघवी यांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. कर्जबाजारीपणामुळे शशीकुमार गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असल्याचं म्हटलं जात आहे. या कारणामुळेच त्यांनी आत्महत्या केली का याचा तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शशीकुमार यांनी बऱ्याच तामिळ मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यांची पत्नीसुद्धा छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 5:01 pm

Web Title: tamil television actor sasikumar commits suicide hangs himself on a tree ssv 92
Next Stories
1 संसाराविषयी शाहिदने प्रियांकाला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
2 ‘हाऊसफुल ४’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी रुपये
3 ‘अग्गंबाई सासूबाई’मधील आजोबांविषयी या रंजक गोष्टी माहितीयेत का?
Just Now!
X