28 October 2020

News Flash

Video : तान्हाजींच्या वंशजांना का नाही पटला चित्रपटाचा शेवट?

तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांनी चित्रपटाच्या शेवटावर व्यक्त केली खंत

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या ओम राऊत दिग्दर्शित चित्रपटाच्या शेवटी नरवीर तान्हाजी मालुसरे हे उदयभान राठोडला ठार मारतात असे दाखवण्यात आले आहे. मात्र चित्रपटाचा हा शेवट तान्हाजींच्या वंशजांना पटला नाही. लोकसत्ता ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खंत व्यक्त केली.

शिवराज मालुसरे हे तान्हाजींचे बारावे वंशज.. त्यांच्या पत्नी शीतल मालुसरे यांनी तान्हाजींच्या इतिहासावर पीएचडी केली आहे. अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाविषयी बरीच मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. अशातच तान्हाजींच्या वंशजांनी चित्रपटाच्या शेवटाविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘उदयभान राठोडवर शेवटचा वार हे शेलार मामा करतात, त्यामुळे चित्रपटात ते दाखवणं गरजेचं होतं,’ असं शीतल मालुसरे म्हणतात.

पाहा त्यांची मुलाखत-

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा अजय देवगणचा १०० वा चित्रपट असून बॉक्स ऑफिसवर त्याची दणक्यात कमाई सुरू आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 6:13 pm

Web Title: tanhaji malusare descendants on tanhaji movie end ssv 92
Next Stories
1 आर्ची म्हणते, “नाइट लाइफ म्हणजे काय रे भाऊ?”
2 ‘तू देश सोडून जा’ असा सल्ला देणाऱ्या महिलेला जावेद जाफरीचे भन्नाट उत्तर, म्हणाला…
3 तान्हाजींच्या वंशजांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी
Just Now!
X