News Flash

VIDEO : तान्हाजीच्या शूटींगवेळी चुकून निघाला ‘हा’ शब्द; पण दिग्दर्शक म्हणाले…

देवदत्त नागेने सांगितला शूटिंगदरम्यानचा किस्सा..

‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाने केवळ दहा दिवसांत कमाईचा १५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. ओम राऊत यांना हिंदी चित्रपटाच्या पदार्पणातच हे यश मिळालं आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटात अभिनेता अजय देवगणने तान्हाजींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात देवदत्त नागे, शरद केळकर, अजिंक्य देव यांसारखे मराठी कलाकारसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा अभिनेता देवदत्त नागेनं ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला.

‘जय मल्हार’ फेम देवदत्त नागेने चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांचे बंधू सूर्याची मालुसरेंची भूमिका साकारली आहे. रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी जेव्हा तान्हाजी आणि सूर्याजी हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे जातात, तेव्हाचा प्रसंग शूट करतानाचा हा किस्सा देवदत्तने सांगितला..

१० जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाने आतापर्यंत १६७.४५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 1:26 pm

Web Title: tanhaji the unsung warrior devdatta nage sharad kelkar om raut watch video ssv 92
Next Stories
1 भारताबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यावरून सैफ अली खानवर संतापले नेटकरी
2 पद्मिनी कोल्हापुरेंनी ‘प्रवास’निमित्त जपली ही आवड!
3 ‘तान्हाजी’ चित्रपटात चुलत्याची भूमिका साकारणारा हा मराठी अभिनेता कोण ?
Just Now!
X