09 August 2020

News Flash

‘तान्हाजी’चा मराठी टीझरही प्रदर्शित

‘गड आला पण सिंह गेला’ हे कथानक आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासात अनेकदा वाचले आहे.

तान्हाजी : द अनसंग वॉरिअर

‘गड आला पण सिंह गेला’ हे कथानक आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासात अनेकदा वाचले आहे. तानाजी मालूसरे यांनी सिंहगडावर गाजवलेला पराक्रम ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अलिकडेच या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर प्रदर्शित झाला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाची हिंदीप्रमाणेच मराठीत देखील निर्मिती व्हावी अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता या चित्रपटाचा मराठी भाषेतील टिझर प्रदर्शित झाला आहे.

गार्डन किंवा समुद्र किनाऱ्यावर नाही, तर खासदाराने चक्क संसदेत केलं प्रपोज

काही मिनिटांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’च्या मराठी टीझरवर आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतीनं पटकावला ‘मिस युनिव्हर्स २०१९’ चा किताब

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वटवणार आहेत. हा चित्रपट येत्या १० जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 4:56 pm

Web Title: tanhaji the unsung warrior marathi teaser mppg 94
Next Stories
1 “बलात्काऱ्यांविरोधात खटला चालवून लोकांचे पैसे कशाला वाया घालवायचे?”, वहीदा रहमान यांचा सवाल
2 आमिर खानची मुलगी सिनेमा नाही, तर करणार नाटक
3 कार्तिक पडला अर्जुनवर भारी, बॉक्स ऑफिसवर ‘पती पत्नी और वो’ची दमदार कमाई
Just Now!
X