News Flash

Video : ‘तान्हाजी’मधील ‘माय भवानी’ गाणं प्रदर्शित

या गाण्यामध्ये भवानी मातेचं महात्म्य सांगितलं असून तिचं कौतुक केलं आहे

तान्हाजी : द अनसंग वॉरिअर

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या बहुचर्चित ठरलेल्या चित्रपटातलं ‘शंकरा रे शंकरा’ हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर आता या चित्रपटातलं दुसरं गाणंही प्रदर्शित झालं आहे. ‘माय भवानी’ असे या गाण्याचे बोल असून यात अभिनेता अजय देवगण आणि काजोलने ठेका धरला आहे.

तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर भव्यदिव्य स्वरुपात पाहायला मिळणार आहे. यामध्ये अजय देवगण तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. या गाण्यामध्ये भवानी मातेचं महात्म्य सांगितलं असून तिचं कौतुक केलं आहे. तसंच देवीच्या स्तुतीमध्ये तान्हाजी,त्यांच्या पत्नी आणि सारेच मावळे रंगून गेल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेची देखील झळकला आहे.


ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर, जगपती बाबू, पंकज त्रिपाठी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 1:08 pm

Web Title: tanhaji the unsung warrior movie new song maay bhavani song out ssj 93
Next Stories
1 ‘छपाक’आधी ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटातून उलगडली अ‍ॅसिडग्रस्त तरुणीची कथा
2 का होतात कलाकारांमध्ये भांडणं? अक्षय कुमारने सांगितलं कारण
3 सर्वात सेक्सी महिला; तिने कतरिना, प्रियांकालाही टाकले मागे
Just Now!
X