News Flash

‘तान्हाजी’मधील सावित्रीबाईंच्या लूकसाठी या शिक्षिकेने केली ओम राऊतांची मदत

चित्रपटाचे नाव आणि त्यातील कलाकारांच्या लूकसंदर्भात या शिक्षिकेने दिग्दर्शक ओम राऊत यांना काही सल्ले दिले.

kajol
काजोल

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा दाखवणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटात अजय देवगणने तान्हाजींची भूमिका साकारली असून काजोल त्यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरेंच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे नाव आणि त्यातील कलाकारांच्या लूकसंदर्भात एका शिक्षिकेने दिग्दर्शक ओम राऊत यांना काही सल्ले दिले. या शिक्षिका तान्हाजी मालुसरेंच्या वंशज आहेत.

तान्हाजी मालुसरेंचे बारावे वंशज शिवराज मालुसरे यांच्या पत्नी शीतल मालुसरेंनी ‘तान्हाजी’ या नावापासून चित्रपटात सावित्रीबाईंचा लूक कसा असावा याबाबतचे बरेच सल्ले ओम राऊत यांना दिले. शीतल मालुसरे यांनी तान्हाजी मालुसरे यांच्या इतिहासावर पीएचडी केली आहे. त्यामुळे इतिहासातील बरेचसे संदर्भ जाणून घेण्यासाठी ओम राऊत शीतल यांच्याशी संपर्क साधायचे. त्यावेळी सावित्रीबाईंच्या लूकसाठीही शीतल यांनी मदत केली. ‘सावित्रीबाई म्हणजे तेव्हाच्या एका सरदाराची घरंदाज स्त्री.. त्यामुळे त्या पद्धतीने त्यांचा लूक व्हावा असे मी ओम राऊतांना सांगितले,’ असं शीतल मालुसरे म्हणाल्या.

पाहा फोटो : ‘तान्हाजी’: चुलत्याची भूमिका साकारणाऱ्या कैलासची पत्नी आहे लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री

‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या या विशेष मुलाखतीत शीतल मालुसरे यांनी इतिहासातील बरेच मुद्दे सविस्तरपणे सांगितले. तान्हाजींच्या नावामागील इतिहाससुद्धा त्यांनी सांगितला. शीतल मालुसरे यांनी दिलेल्या माहितीनुसारच चित्रपटाचे नाव ‘तानाजी’वरून ‘तान्हाजी’ ठेवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनेक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी शीतल मालुसरे व्याख्यानंसुद्धा देतात. चित्रपटाच्या माध्यमातून तान्हाजींचा इतिहास घराघरांत पोहोचतोय याचा आनंद आहे, अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2020 4:29 pm

Web Title: tanhaji the unsung warrior this teacher helped for savitribai look in the film ssv 92
Next Stories
1 ‘तान्हाजी’मुळे अजयचा भाव वधारला; ठरला लोकप्रिय अभिनेता
2 ‘हा’ ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट संगीतकार; पटकावले ५ ग्रॅमी पुरस्कार
3 Video: अशोक मामांनी सांगितली ‘हा माझा बायको पार्वती’ डायलॉगमागील खरी गंमत
Just Now!
X