टाटा ग्रुपच्या ‘तनिष्क’ या दागिण्यांच्या ब्रॅण्डची एक नवी जाहिरात सध्या प्रचंड चर्चेत आहे. या जाहिरातीत दोन वेगळ्या धर्मातील व्यक्तींच्या लग्नासंदर्भात भाष्य करण्यात आलं आहे. मात्र ही जाहिरात काही प्रेक्षकांना आवडली नाही. त्यांनी सोशल मीडियाद्वारे #BoycottTanishq असं म्हणत आपला विरोध दर्शवला. अखेर वाढत्या टीकेमुळे ‘तनिष्कने’ ही जाहिरात मागे घेतली. दरम्यान कंपनीच्या या निर्णयावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने नाराजी व्यक्त केली. “इतकी विशाल कंपनी अन् पाठीचा कणा एतका कमकूवत कसा?” असा प्रश्नार्थक टोला तिने टाटा ग्रुपला लगावला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मोदींना पाठवा हा मेसेज; सुशांतच्या बहिणीचं आवाहन

“तुमच्याकडे फाटलेले कपडे असतील तर सारा अली खानला द्या”, अभिनेत्याचं अजब आवाहन

मुस्लिम कुटुंबामध्ये लग्न करुन गेलेल्या हिंदू तरुणीसाठी तिच्या सासरचे लोकं हिंदू प्रथांप्रमाणे डोहाळे जेवण करण्याचा निर्णय घेतात असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. तनिष्कने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीप्रमाणे सुनेवर प्रेम करणाऱ्या कुटुंबामध्ये या तरुणीचे लग्न झालं आहे. सामान्यपणे ज्या गोष्टी कुटुंबामध्ये साजऱ्या होत नाहीत त्या गोष्टी केवळ तिच्यासाठी साजरा करण्याचा निर्णय कुटुंब घेतं. दोन वेगळे धर्म, परंपरा आणि संस्कृतीला मेळ या जाहिरातीमध्ये साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र अनेकांना ही जाहिरात फारशी आवडलेली नाही. या जाहिरातीमधून लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.