तनुश्रीनं माझ्यावर बलात्कार केला असा खळबळजनक आरोप करणाऱ्याला राखी सावंतला तनुश्रीनं सणसणीत टोला लगावला आहे. राखी सावंतनं चेहऱ्याबरोबर स्वत:च्या मेंदूवरही प्लास्टिक सर्जरी केली आहे का असा सवाल तिनं विचारला आहे. गेल्या आठवड्यात राखी सावंतनं पत्रकार परिषद घेतली होती. यात तिनं ‘काही वर्षांपूर्वी तनुश्री माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्यामुळे मी तिच्यासोबत बऱ्याच रेव्ह पार्ट्यांना जात असे. तेव्हा ड्रग्जच्या नशेत तिने माझ्यावर अनेकदा बलात्कार केला होता’ असा आरोप केला. राखीच्या या आरोपांना तनुश्रीनं सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘राखी सावंत आणि माझ्यात कधीही मैत्री नव्हती. आयुष्यात योग्य मित्र- मैत्रीणींची निवड करावी असं माझ्या पालकांनी मला शिकवलं, म्हणूनच चुकीच्या माणसांशी मैत्री करणं मी नेहमीच टाळते. त्यामुळे अशिक्षित, असंस्कारी, घाणेरडी, चरित्रहीन, दर्जाहिन व्यक्ती माझी मैत्रीण असूच शकत नाही, जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला अक्षरश: किळस वाटली’ असं तनुश्री म्हणाली.

‘आंतरराष्ट्रीय विमानतळावर माझी आणि राखीची एकदाच भेट झाली होती. त्यावेळी एका कामासाठी मी परदेशी जात होती. राखीनं मला गाठलं. मी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी ती आग्रह करू लागली. ती स्वत:ला माझी मैत्रीण म्हणवून घ्यायची आणि सतत माझ्या संपर्कात येऊन काहीतरी विचित्र माझ्या मनात भरवून देण्याचा ती प्रयत्न करायची’ असंही तनुश्रीनं म्हणाली.

‘राखीसारख्या माणसांमुळे देशात अल्पसंख्यांक लोक असुरक्षित आहेत. जेव्हा असे लोक हिंदू धर्मात असतात तेव्हा ते इतर धर्मांना तुच्छ लेखतात आणि ज्यावेळी अशी माणसं धर्म बदलतात तेव्हा ते आपल्याच धर्माची बदनामी करतात. राखी सावंतनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. कदाचित हा प्रसंग मी जगाला सांगेन याची भीती वाटल्यानं राखीनं माझ्याबद्दल अफवा पसरवल्या असतील असा आरोप तनुश्रीनं केला आहे.

‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर राखी सावंत नाना पाटेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली होती. तिनं तनुश्री व्यसनाधीन होती, असा दावा केला होता. त्यानंतर तनुश्रीनं राखीवर १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. तनुश्रीनं दावा ठोकल्यानंतर राखीनं तनुश्री ही होमोसेक्शुअल असल्याचं म्हणत तिच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.