मंगेश हाडवळे ह्यांची कथा आणि पटकथा असलेला ‘टपाल’ ह्या मराठी चित्रपटाचा जागतिक प्रीमिअर ‘१८ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ संपन्न होणार आहे. लक्ष्मण उतेकर ह्या हिंदीतील आघाडीच्या सिनेमेटोग्राफरचा दिग्दर्शक म्हणून ‘टपाल’ हा पहिला चित्रपट आहे आणि त्याला आशिया खंडातील सगळ्यात मानाचा मानल्या जाणाऱ्या बुसान महोत्सवात जागतिक प्रीमिअर करण्याचा मान मिळाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्या वर्षा सत्पाळकर ह्यांनी सांगितले की, आमच्या मैत्रेय मास मिडिया कंपने तयार केलेली ही पहिली कलाकृती आहे त्यासाठी संपूर्ण टीम ने खूप मेहनत घेतली आणि त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे भारतीय प्रेक्षकांसाठी जानेवारी महिन्यात ‘टपाल’चे प्रदर्शन आम्ही करणार आहोत. दक्षिण कोरियातील बुसान चित्रपट महोत्सवात ह्या पूर्वी मंगेश हाडवळे ह्याच्या ‘देख इंडीयन सर्कस‘ ह्या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळालेले आहे आणि ‘टपाल’चा तो क्रियेटीव्ह निर्माता पण आहे. मंगेश ने सांगितले कि, ‘टपाल’ चित्रपट हा आमच्या सगळ्यांचा आवडता चित्रपट आहे कारण मी प्रथमत: दुसऱ्यासाठी चित्रपट लिहिला आहे. नोव्हेंबर महिन्यात टपाल सिडनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. तसेच दुबई, बर्लिन, टोरांटो ह्या ठिकाणी ‘टपाल’ निवड प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला आहे.
नंदू माधव, विणा जामकर, रोहित उतेकर, गंगा उगवले आणि मिलिंद गुणाजी ह्यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत रोहित नागभिडे ह्यांचे असून प्रकाश होळकर ह्यांनी गीते लिहिली आहेत.
३ ऑक्टोबरला महोत्सव सुरु होत असून ४ तारखेला ‘टपाल’चा पहिल पहिल्यांदा दाखवला जाणार आहे. तर ७ आणि १० तारखेला तो पुन्हा दाखवण्यात येईल.