News Flash

तापसीने मुंबईत घेतलं तिच्या स्वप्नांचं घर

सिनेसृष्टीतील कलाकारांची घरं नेहमीच वैविध्यपूर्ण व खास असतात.

तापसी पन्नु

मुंबईत स्वतःचं घर असावं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. बॉलिवूडमधील कलाकारही त्याला अपवाद नाहीत. सिनेसृष्टीतील कलाकारांची घरं नेहमीच वैविध्यपूर्ण व खास असतात. कलाकारांच्या चाहत्यांना घराबद्दल जाणून घेण्याची फार उत्सुकता असते. ‘पिंक’, ‘नाम शबाना’, ‘बदला’ अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पडणाऱ्या तापसी पन्नूने मुंबईत नवीन फ्लॅट घेतला असून तिच्या चाहत्यांमध्ये याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, “तापसीने जेव्हा ऐकले की, हा फ्लॅट विकायचा आहे, तेव्हा तिने लगेचच तो विकत घेतला. या घराचे इंटेरिअर तिची बहीण करणार आहे. त्यांनी काम करणे सुरु केले असून हे घर एका थीमनुसार सजवले जाणार आहे.” थायलँमधील ‘कोह समुई’ येथे तापसी  फिरायला गेली होती. तिथून तिने काही लाईट्स आणले आहेत. मागील वर्षी स्पेनमध्ये गेल्यानंतरही तिने घर सजवण्याच्या काही वस्तू घेतल्या होत्या.

वाचा : घराणेशाहीवर बोलण्यापेक्षा कामातून व्यक्त व्हा – अनन्या पांडे

सध्या तापसीचे लक्ष ‘गेम ओव्हर’ या थ्रिलर चित्रपटावर आहे. या चित्रपटाचे नाव प्रदर्शित होताच चाहत्यांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता होती. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधून असे दिसते की, चित्रपटाची संपूर्ण कथा ही तापसी आणि व्हिडिओ गेमभोवती फिरते. ‘गेम ओव्हर’ हा एक थरारपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अंगावर काटा आणणारे काही सीन दाखवण्यात आले आहेत. हा चित्रपट तमिळसह हिंदी आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन सरवनन करणार असून हिंदीमध्ये अनुराग कश्यप सादर करणार आहे. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होईल.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 6:56 pm

Web Title: tapsee pannu ner flat decoration theme
Next Stories
1 ‘जसे आहोत तसे स्वीकारा’, मेकअपविना फोटो पोस्ट करत काजल अग्रवालचा संदेश
2 घराणेशाहीवर बोलण्यापेक्षा कामातून व्यक्त व्हा – अनन्या पांडे
3 तुमच्या आवडत्या मालिकांसोबत रंगणार मनोरंजनचा रविवार
Just Now!
X