News Flash

… ही अभिनेत्री दाखवून देणार बांगलादेशी निर्वासितांच्या यातना

'गाजी' या चित्रपटाचे कथानक सत्य घटनेवर आधारित आहे.

तापसी पन्नू 'गाजी' चित्रपटात बांगलादेशी निर्वासिताची भूमिका साकारणार आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘पिंक’ या चित्रपटामध्ये लक्षवेधी भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात घर केलेली तापसी पन्नू आपल्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. आगामी ‘गाजी’ या चित्रपटात तापसी पन्नू एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात काम करण्याची मिळालेली संधी आनंद देणारी असल्याचे तिने म्हटले. ‘गाजी’ चित्रपटामध्ये ती एका बांगलादेशी निर्वासिताची भूमिका साकारताना दिसेल. तापसीने या चित्रपटातील गुपितांचा खुलासा करताना चित्रपटाचे कथानक सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगितले. हा चित्रपट इतर चित्रपटांपेक्षा अधिक वेगळा असल्यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करेल, असा विश्वास तिने यावेळी व्यक्त केला.
या चित्रपटाविषयी अधिक माहिती देण्याचे टाळत तिने आपला आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल देखील मनमोकळ्या गप्पा मारल्या. आतापर्यंत तिचे मोजके तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या मोजक्या चित्रपटामध्ये चांगली भूमिका मिळाल्याचे श्रेय तिने नशीबाला दिले. ‘पिंक’ चित्रपटाच्या यशामूळे तापसी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. २०१० मध्ये तेलगू चित्रपटातून तापसीने चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. ‘गाजा’ हा तापसीचा तिसरा हिंदी चित्रपट असून पहिल्या चित्रपटापासून तिला संघर्षाचा सामना करावा लागला आहे. २०१३ मध्ये ‘चष्मे बहादूर’ या चित्रपटातून तापसीने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर ‘पिंक’मधील भूमिकेने तिने आपली छबी उमटवली. पहिल्या चित्रपटातील यश टिकवून ठेवण्यासाठी योग्य चित्रपटाची निवड करणे, हाच मोठा संघर्ष असल्याचे ती यावेळी म्हणाली. अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘पिंक’ चित्रपटात तापसी पन्नूसह क्रिती कुल्हारी, अंगद बेदी, पियुष मिश्रा हे कलाकार दिसले होते. तर ‘गाजी’ चित्रपटात तापसीसोबत ‘बाहुबली’ चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता राणा डग्गुबती दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 8:04 pm

Web Title: tapsee pannu playing interesting role in ghazi
Next Stories
1 सोनमचा भावाला दिलेला हा सल्ला ऐकून तुम्हीही व्हाल चकित
2 मिथुन चक्रवर्तीची तब्येत खालावली, उपचारासाठी अमेरिकेत रवाना
3 ..या चित्रपटाचे पाकिस्तानमधील चित्रीकरण रद्द
Just Now!
X